Ashish Shelar : कोल्हापुरात लवकरच चित्रपट संग््राहालय उभे राहील

प्रक्रिया गतिमान करू; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही
Ashish Shelar
कोल्हापूर : सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी टाऊन हॉल संग््राहालयास भेट दिली. यावेळी डॉ. तेजस गर्गे, उदय सुर्वे, महेश जाधव आदी उपस्थित होते. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

अनिल देशमुख

कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच चित्रपट संग््राहालय उभे राहील, त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया गतिमान केली जाणार असल्याची ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दैनिक ‌‘पुढारी‌’शी बोलताना दिली.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शेलार यांनी टाऊन हॉल संग््राहालयाला भेट दिली. यानंतर बोलताना मंत्री शेलार म्हणाले, कोल्हापूरला चित्रपट निर्मितीचा मोठा आणि ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाचे जतन करण्यासाठी कोल्हापूरच्या चित्रनगरीत फिल्म म्युझियम उभारण्याचा निर्णय गतवर्षी घेतला आहे. या संग््राहालयाची फाईल्स सध्या मंत्रालयात आहे, त्याला गती दिली जाईल आणि लवकरच हे संग््राहालय उभे राहील. या संग््राहालयात जुने कॅमेरे, पोस्टर्स, वेशभूषा आणि चित्रपटांशी संबंधित दुर्मीळ वस्तू लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यासह मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवजही या संग््राहालयात पाहता येणार आहेत. यामुळे कोल्हापूरची चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून असलेली ओळख अधिक ठळक होणार आहे.

चित्रनगरीशी संबंधित कामे वेळेत पूर्ण होतील

दरम्यान, कोल्हापूर चित्रनगरीत सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्प, कामांनाही गती देण्यात आली आहे. ही सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घेतली जात असल्याचेही शेलार यांनी सांगितले.

संग््राहालयांना अधिकाधिक विद्यार्थी भेट देणार

कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल संग््राहालय, लक्ष्मी विलास पॅलेस आदी संग््राहालयांना अधिकाधिक विद्यार्थी भेट देतील, यासाठी प्रयत्न केले जातील. याबाबत शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पुरातत्त्व व वस्तुसंग््राहालयाचे संचानालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, कोल्हापूर वस्तुसंग््राहालयाचे सहायक अभिरक्षक उदय सुर्वे यांनी मंत्री शेलार यांना टाऊन हॉल वस्तुसंग््राहलयाची माहिती दिली. त्यांनी चित्रदालन, शिल्प दालन, व्यक्तिचित्र दालन, धातुवस्तू दालन, शस्त्र दालनला भेट दिली. पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक डॉ. हेमंत दळवी, सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, विनायक बोगरे, भाजपचे महेश जाधव, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, बाळसाहेब कांबळे, अस्लम काझी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news