समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर : अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे

विद्यापीठात कार्यशाळेचा समारोप
कोल्हापूर :  कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलताना अभिनेते  डॉ. मिलिंद शिंदे.
कोल्हापूर : कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलताना अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्यासह दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या जगण्याला मुख्य प्रवाहाशी जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी कलावंतांवर आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, कवी व लेखक डॉ. मिलिंद शिंदे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते ‘वंचित घटक आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा’ या विषयावर बोलत होते. वंचितांच्या वेदना, संघर्ष आणि जीवनानुभव कलांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले जातात, तेव्हाच समाज अधिक संवेदनशील आणि समतोल बनतो. कलावंत हा केवळ मनोरंजन करणारा नसून समाजजाणीव जागृत करणारा, प्रबोधन करणारा आणि सांस्कृतिक आरोग्य जपणारा घटक आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्यासह आचार्य अत्रे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, मीरा नायर, दीपा मेहता, शबाना आझमी, स्मिता पाटील, नंदिता दास आदींच्या योगदानामुळे वंचितांच्या प्रश्नांना व्यापक वाचा मिळाली, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अश्विनी धायगुडे-कोळेकर यांनी ‘सिनेमातील लिंगाधारित पूर्वग्रह’, तर डॉ. अनमोल कोठाडिया यांनी ‘वंचितांच्या चित्रपटांचे भवितव्य आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी, चित्रपट अभ्यासक, माध्यम क्षेत्रातील व्यक्ती व चित्रपट रसिक उपस्थित होते. डॉ. शिवाजी जाधव यांनी संयोजन केले. अनुप जत्राटकर यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news