kolhapur | दहा दिवस ठिय्या; अखेर ठोकल्या बेड्या; शस्त्र तस्कर म्होरक्याच्या आवळल्या मुसक्या

कोल्हापूर पोलिसांचा मध्य प्रदेशात छापा; दोन लाख रु.च्या 4 पिस्तूल जप्त
कोल्हापूर : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील संघटित टोळ्यांना अत्याधुनिक शस्त्रे पुरविणार्‍या मध्य प्रदेशातील कुख्यात तस्कराला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. संशयिताकडून चार पिस्तूल हस्तगत करण्यात आले.
कोल्हापूर : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील संघटित टोळ्यांना अत्याधुनिक शस्त्रे पुरविणार्‍या मध्य प्रदेशातील कुख्यात तस्कराला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. संशयिताकडून चार पिस्तूल हस्तगत करण्यात आले. (छाया : नाज ट्रेनर)
Published on
Updated on

कोल्हापूर : पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आणि कुख्यात शस्त्र तस्कर मनीष रामविलास नागोरी (रा. यड्राव, ता. शिरोळ) याच्यासह संघटित टोळ्यांना पिस्तूलसह अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर, काडतुसे पुरविणार्‍या आंतरराज्य शस्त्र तस्कराला कोल्हापूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील खरगुण जिल्ह्यात बेड्या ठोकल्या. सरनाम नाहरसिंह बरनाला (वय 28, रा. सिंगनूर पोस्ट, ता. गोगावा, जि. खरगुण, मध्य प्रदेश) असे त्याचे नाव आहे. तस्कराकडून 2 लाख रुपये किमतीची 4 पिस्तूल हस्तगत करण्यात आली आहेत.

मध्य प्रदेश, पंजाबातही कारनामे

शस्त्र तस्करीटोळीचा म्होरक्या सरनाम बरनाला सराईत गुन्हेगार आहे. संशयिताविरुद्ध मध्य प्रदेशातील उमरटी, पाचोरी, बुर्‍हाणपूर तसेच पंजाबमधील मोहालीत शस्त्र तस्करीसह अन्य गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे.

नागोरी - बरनाला कनेक्शन चव्हाट्यावर

कुख्यात तस्कर मनीष नागोरी याच्याशी त्याचे कनेक्शन उघड झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्य प्रदेशात ठिकठिकाणी छापे टाकून त्यास जेरबंद केले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी बरनाला याला दि. 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी बजावली आहे.

कोल्हापूरसह प. महाराष्ट्रातील टोळ्यांचे कनेक्शन

कुख्यात तस्कराशी कनेक्शन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नामचिन गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांचे लागेबांधे चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे, असे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. संशयिताकडे चौकशी सुरू असून शस्त्र तस्करीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

तस्कराचा शोध : कोल्हापूर पोलिसांचा 10 दिवस ठिय्या

नागोरीला पंधरवड्यापूर्वी शहापूर पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या चौकशीत मध्य प्रदेशातील तस्कराचे नाव निष्पन्न झाले. सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, शेष मोरे यांच्या पथकाने बुर्‍हाणपूर,सिंगणूर येथे दहा दिवस तळ ठोकला. बुर्‍हाणपूर येथे पोलिसांनी पाठलाग केला. मात्र, पिस्तूल असलेली पिशवी रस्त्यावर टाकून संशयित पसार झाला. त्यानंतर बिस्टान पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध घेऊन त्यास मध्य प्रदेशातील सिंगनूरजवळ बेड्या ठोकण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news