Armed attack case | पूर्ववैमनस्यातून एकावर सशस्त्र हल्ला

इचलकरंजीतील घटना; सातजणांवर गुन्हा दाखल
Crime  News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

इचलकरंजी : जुना वाद मिटवण्यासाठी बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाणीसह शस्त्राने केलेल्या हल्ल्यात जाफर सादीक मकानदार (वय 22, रा. कृष्णानगर, शहापूर) हा जखमी झाला. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती पो.नि. महेश चव्हाण यांनी दिली.

नासीर गड्डेकर याच्या दुचाकीवरील रेडियम अक्षरे जाफर मकानदार आणि शाहिद सय्यद यांनी खोडल्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद मिटवण्याचे कारण सांगत साहिल जमादार याने जाफर याला 5 मे रोजी रात्री 9 वाजता बालाजी चौकात बोलावून घेतले. त्याठिकाणी साहिल समीर जमादार (रा. कोरोची), साहिल मुस्ता मुल्ला (रा. कृष्णानगर), निहाल रियाज कलावंत (रा. साईनगर), रिहान अजीम गोलंदाज (रा. आरगे मळा), आयन मोहम्मद मगदूम (रा. दत्तनगर), कैफ अन्सार जमादार (रा. विक्रमनगर) व हर्षवर्धन बजरंग रामसे (रा. गौरीशंकरनगर, तारदाळ) यांच्याशी पुन्हा वाद झाला. त्यातूनच हर्षवर्धन रामसे याने धारदार शस्त्राने जाफर याच्या खांद्यावर, मानेवर, पाठीवर वार केले तर उर्वरित संशयितांनी त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news