उदगांव येथे ३० बेडच्या आयुष रुग्णालयाला मान्यता : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

आयुर्वेदिक, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार व पंचकर्म सेवा मिळणार मोफत
Approval for 30-bed AYUSH hospital in Udgaon: MLA Rajendra Patil Yadravkar
उदगांव येथे ३० बेडच्या आयुष रुग्णालयाला मान्यता : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरFile Photo
Published on
Updated on

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

उदगाव ता.शिरोळ येथील क्षयरोग रुग्णालयाच्या जागेत ३० खाटांच्या नवीन आयुष रुग्णालयाची मंजुरी मिळाली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यातील नागरिकांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग, पंचकर्म व निसर्गोपचार अशा विविध उपचार पद्धती मोफत उपलब्ध होणार आहेत. शिरोळ तालुक्याला उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणारा 'मेडिकल हब' बनवण्याचा संकल्प केला होता. त्याच्या पूर्ततेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. याआधी उदगाव येथे ग्रामीण रुग्णालय तसेच मंजूर झालेले मनोरुग्णालय ही मोठी पावले होती. आता आयुष रुग्णालयाच्या स्थापनेसाठी मान्यता मिळाल्याने तालुका आरोग्य सुविधांच्या दृष्टीने सक्षम बनत आहे.

शासकीय आयुष रुग्णालय सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, पंचकर्म आणि निसर्गोपचार यांसारख्या उपचारांची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे केवळ आधुनिक औषधांवर अवलंबून न राहता पारंपरिक आणि नैसर्गिक उपचारांची सेवा या रुग्णालयाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील जनतेला मिळणार आहे.

आयुष रुग्णालयामुळे स्थानिक नागरिकांसाठी आरोग्यसेवा अधिक व्यापक होणार आहे. येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि नैसर्गिक उपचारांसाठी पंचकर्म, योग थेरपी, नैसर्गिक उपचार, तसेच होमिओपॅथी आणि युनानी पद्धतींची सुविधा असेल. यामुळे जीवनशैलीशी संबंधित विकार, संधिवात, पचनाचे आजार, त्वचेच्या तक्रारी आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्यांवर अधिक प्रभावी उपाय उपलब्ध होणार आहेत.

सर्वसामान्य नागरिकांसाठी हे रुग्णालय वरदान ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत आयुष उपचार सहज उपलब्ध होतील. तसेच, पंचकर्म आणि योग थेरपी यांसारख्या उपचारपद्धतीमुळे अनेक जुनाट आणि जटिल आजारांवर उपचार मिळणार आहेत. लवकरच या रुग्णालयाच्या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळेल आणि त्यानंतर तत्काळ बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news