Gokul dudh | ‘गोकुळ’वर शासकीय प्रशासक नियुक्त करा : आ. शिवाजी पाटील

Gokul dudh |
Gokul dudh | ‘गोकुळ’वर शासकीय प्रशासक नियुक्त करा : आ. शिवाजी पाटील
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘गोकुळ’वर शासकीय प्रशासक नियुक्त करा, अशी मागणी आ. शिवाजी पाटील यांनी केली आहे. बुधवारी (दि.22) त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रशासक नियुक्तीबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

‘गोकुळ’मधील वर्चस्ववादावरून भाजप-राष्ट्रवादीमध्येच संघर्ष उफाळला आहे. सहायक निबंधकांच्या तडकाफडकी बदल्या, शह-काटशाहचे राजकारण, आरोप-प्रत्यारोपांची पत्रकबाजी यामधून दोन्ही पक्षांमध्ये संबंध ताणले आहेत. सत्ताधारी आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आ. शिवाजी पाटील आक्रमक झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरही त्यांनी जिल्ह्यात भाजप संपवणारे ‘गोकुळ’मध्ये सोबत नको, अशी उघड भूमिका घेतली.

बुधवारी आ. पाटील मुंबईला गेले होते. जिल्ह्यातील महायुतीचे सर्वच नेते मुंबईत उपस्थित होते. त्यामुळे ‘गोकुळ’संदर्भात बैठक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या चर्चेत बराच वेळ गेला यानंतर मुख्यमंत्री नागपूरला रवाना झाल्याने बैठक होऊ शकली नाही. या दरम्यान आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन ‘गोकुळ’वर शासकीय प्रशासक नियुक्त करण्याची मागणी केली. मागणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

सुनावणी थांबल्यामुळे दूध संस्थांमध्ये नाराजी

‘गोकुळ’ सलग्न अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयात सुरू असलेली सुनावणी तीन दिवसांपासून थांबली आहे. सुनावणीमध्ये वारंवार येणार्‍या अडथळ्यांमुळे संस्था प्रतिनिधींमधून तीव— नाराजी व्यक्त होत आहे. सुनावणी घेण्यासंदर्भात शुक्रवारी संस्था प्रतिनिधी सहायक निबंधक कृष्णात ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

पंधरा दिवसांत दोन सहायक निबंधकांच्या तडकाफडकी झालेल्या बदल्या, बदलीनंतर नव्या अधिकार्‍यांनी उशिरा स्वीकारलेला पदभार त्यानंतर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे आणि शासकीय कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप यामुळे अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांच्या सुनावण्या वारंवार लांबणीवर पडत आहेत. नोटीसवर नमूद केलेल्या तारखेला सुनावणी होत नसून हेलपाटे मारावे लागत असल्याने संस्था प्रतिनिधी संतप्त झाले आहेत. नुकतेच यावरून सहायक निबंधक कार्यालयात प्रतिनिधींकडून लिपिकाची गळपट धरण्याचा प्रयत्न झाला आहे. सुनावणी थांबल्याने आज पुन्हा संस्था प्रतिनिधी सहायक निबंधक यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीचे तीव— पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news