Sonsogor mountain climbing: अन्वीने 7 तासांत सर केले सोनसोगोर शिखर

बाल गिर्यारोहक अन्वी घाटगेचा शिवजयंतीनिमित्त अनोखा विक्रम
Sonsogor mountain climbing
Sonsogor mountain climbing: अन्वीने 7 तासांत सर केले सोनसोगोर शिखरPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : सह्याद्रीच्या (पश्चिम घाट) संगेतील गोवा येथील सर्वोच्च शिखर म्हणजे सोनसोगोर. या शिखरावर चढाई अत्यंत कठीण व अवघड मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूरची अवघ्या 6 वर्षांची विक्रमवीर बाल गिर्यारोहक अन्वी अनिता चेतन घाटगे हिने हे शिखर 7 तासांत सर करून नवा विक्रम केला. या मोहिमेतून तिने प्लास्टिकचा वापर कमी करा, निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा, गड किल्ल्यांवर व शिखरांवरती प्लास्टिक नकोच, असा संदेश देऊन शिखरावर शिवध्वज फडकाविला.

सोनसोगोर शिखर म्हादाई वाईल्ड लाईफमध्ये येत असल्याने वन विभागाच्या परवानगीने मोहीम झाली. शिवजयंती दिवसी सकाळी साडेसहा वाजता शिखर चढाईस प्रारंभ झाला. घनदाट जंगलातून पूर्वीची वाट नसलेने वाट काढत, तीन वेळा नदी क्रॉस करत, 45 अंशांत कललेले शिखर दुपारी सव्वा एक वाजता सर करण्यात आले. 6 तास 45 मिनिटांनी अन्वी शिखरावर पोहोचली, तर परतीचा प्रवास 5 तासांत पूर्ण केला. मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अन्वीचा गौरव वन विभागाचे डीसीएफ जे. सी. वर्गीस (महादाई वन्यजीव अभयारण्य) यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन झाला.

मोहिमेत अन्वीची आई अनिता, वडील चेतन व प्रा. अनिल मगर यांच्यासोबत महादाई वन्यजीव अभयारण्याचे 11 फॉरेस्ट गार्ड यांनी सहभाग घेतला. यासाठी गिरीश बैलुदकर, वैशाली पाटील, राहुल पाटील-यड्रावकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news