

Anita Kadake elected Dattawad sarpanch
दत्तवाड: दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी अनिता कल्लाप्पा कडाके यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळ अधिकारी नितीन कांबळे होते.
एप्रिल २०२१ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. यामध्ये सरपंच पद आरक्षित असल्याने मावळते सरपंच चंद्रकांत कांबळे यांची सरपंच पदावर नियुक्ती झाली. यातील जवळपास पावणे पाच वर्षे चंद्रकांत कांबळे हे सरपंच पदावर कार्यरत होते. उरलेल्या काही महिन्याकरता सरपंच पद आपल्या गटातील व आपल्या समाजातील महिलेलाही मिळावे, या हेतूने त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. यासाठी नूतन सरपंच निवडीसाठी निवड सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनिता कल्लाप्पा कडाके यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी मंडळ अधिकारी नितीन कांबळे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, तलाठी इकबाल मुजावर, पोलीस पाटील संजय पाटील, उपसरपंच रफिक मुल्ला, बबन चौगुले, नूर काले, डी. एन. सिदनाळे, लाला मांजरेकर, सुरेश पाटील, अशोक पाटील, बी.वाय.शिंदे, उत्तम कांबळे आदीसह सत्ताधारी व विरोधी गटातील सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी आभार मानले.