Radhanagari Wildlife Sanctuary | बिबट्याचं पिल्लू, अस्वलाचे दर्शन; ‘राधानगरी ’त प्राणीगणना

अभयारण्यातील 42 मचाणांवर 64 निसर्गप्रेमींचा सहभाग; विविध प्राण्यांसह पक्ष्यांचे दर्शन
Radhanagari Wildlife Sanctuary |
राधानगरी : वन विभागाच्या वतीने बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना करण्यात आली. पाणवठ्यांवर करण्यात आलेल्या मचाणासोबत उपस्थित निसर्गप्रेमींसह वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी.
Published on
Updated on

कोल्हापूर : पाणस्थळावर आलेले बिबट्याचं पिलू, अस्वलाच्या दर्शनासह विविध पशू-पक्षांची चाहूल आणि त्यांचे आवाज निसर्गप्रेमी-पर्यटकांनी अनुभवले. निमीत्तं होतं वन विभागा तर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित वन्यप्राणी गणनेचे.

कोल्हापूर वनविभागाच्यावतीने राधानगरी अभयारण्यात प्राणीगणना करण्यात आली. यासाठी 42 ठिकाणी मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती. 28 मचाण राधानगरी तर 14 मचाण दाजीपूर मध्ये बांधण्यात आले होते. यात 64 निसर्गप्रेमींनी उत्सफूर्त सहभाग नोंदविला.

वन्यप्राणी गणनेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी वनविभागामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी असणार्‍या पानवट्यावर उभारण्यात आलेल्या मचानावर रात्रभर राहून विविध प्राण्याचे आवाज अनुभवले. तसेच वन विभागाचे अधिकारी- कर्मचारी कशा पद्धतीने निसर्ग संरक्षणासह वन्यप्राणी रक्षणाची कामे करतात याचीही माहिती घेतली. प्रकल्पाचे संचालक तुषार चव्हाण, वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका भवर, दाजीपूर व राधानगरी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्यासह वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक , वनमजूर व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

निसर्गसंवर्धनासाठी जनसहभागाचा जागर

वन विभागाच्या वतीने राधानगरीत 28 तर दाजीपूरमध्ये 14 मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती. याद्वारे पर्यटकांनी केवळ प्राणीगणनाच केली नाही, तर वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या खडतर वन्यजीव संरक्षण कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत निसर्ग रक्षणाची शपथ घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news