Mangaon Incident | माणगाव घटनेतील संशयिताचे घर संतप्त जमावाने पेटवले

कर्नाटकातील बोरगावमधून संशयितास अटक
कोल्हापूर : माणगाव घटनेतील संशयिताच्या घरातील साहित्याची तोडफोड करून संतप्त जमावाने घर पेटवून दिले.
कोल्हापूर : माणगाव घटनेतील संशयिताच्या घरातील साहित्याची तोडफोड करून संतप्त जमावाने घर पेटवून दिले.
Published on: 
Updated on: 

रुकडी : माणगाव (ता. हातकणंगले) येथील स्वरा उपाध्ये या १५ वर्षांच्या मुलीच्या खुनाची घटना घडून ४८ तास उलटले, तरीही कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिली नसल्याने खुनातील संशयित अरुण लगमावर याच्या घरावर संतप्त जमावाने सायंकाळी साडेसातच्या सुमारास हल्ला करून प्रापंचिक साहित्याची तोडफोड करून घर पेटवून दिले.

दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर संशयित लगमावर कर्नाटकातील बोरगाव (ता. चिकोडी, जि. बेळगाव) या गावी गेला असता तेथील सतर्क नागरिकांनी सदलगा पोलिसांना याची खबर दिली. त्यांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला जयसिंगपूर पोलिसांनी पुढील तपासासाठी ताब्यात घेतले.

खुनाच्या घटनेनंतर संशयिताच्या घरातील लोकांनी घर सोडून पलायन केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. संतप्त जमावाने पुढे माणगाव फाटा येथे जाऊन कोल्हापूर- इचलकरंजी रस्ता बंद पाडला. यावेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या संशयिताचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी व सरकारच्या वतीने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून संशयिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी माणगावचे माजी सरपंच राजू मगदूम व काही तरुणांनी आमरण उपोषण सुुरू केले होते. रात्री उशिरा राजू मगदूम यांची प्रकृती बिघडली. त्यांनी संतप्त जमावाला शांत केले.

घटनास्थळी रात्री साडेनऊ वाजता उपोषणस्थळी पोलिस अधीक्षक निलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आप्पासाहेब पवार, विभागीय उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी भेट दिली. पोलिस अधीक्षकांनी मुख्यमंत्री यांनी खटला जलदगती न्यायालयात चालविण्यास परवानगी दिली असल्याचे सांगितल्यावर मगदूम यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी आ. अशोकराव माने, दक्षिण भारत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, सचिव शशिकांत राजोबा उपस्थित होते. आ. राहुल आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news