Ambabai temple : फरशीखाली गाडलेल्या दगडी पायऱ्या खुल्या

अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात 3 फूट उत्खननासाठी पुरातत्त्व विभागाकडे विचारणा
Ambabai temple
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपातील फरशी काढल्यामुळे तीन फूट खोल गाडलेल्या दगडी पायऱ्या खुल्या झाल्या आहेत. (छाया :पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या जतन संवर्धन विकासकामात जमिनीखाली गाडल्या गेलेल्या गरुड मंडपाच्या नक्षीदार चार दगडी पायऱ्या खुल्या झाल्या आहेत. सुमारे तीन फूट फरशीखाली या पायऱ्या असून, यावर सुबक नक्षीकाम आहे. यामुळे गरुड मंडपातील उत्खननासाठी देवस्थान समितीने राज्य पुरातत्त्व विभागाकडे विचारणा केली आहे.

अंबाबाई मंदिराच्या 1,400 कोटींच्या विकास आराखड्याच्या पहिल्या 144 कोटींच्या टप्प्यात मंदिर जतन संवर्धनाची कामे सुरू आहेत. मंदिराच्या आवारात 15 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या फरशा काढून किमान 9 ते 10 इंच जाडीच्या दगडी फरशा घालण्यात येणार आहेत. गरुड मंडपाच्या पायरीला लागून असलेल्या फरशा काढण्यात आल्या. या फरशा काढताना आणखी तीन पायऱ्या सापडल्या. यामुळे गरुड मंडपातील उर्वरित फरशी काढून तीन फूट खाली उत्खनन करायचे का? यासंदर्भात पुरातत्त्व विभागाकडून मार्गदर्शक सूचना मागवण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

गरुड मंडपाची उंची वाढवणार

अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव अधिक प्रखरतेने व्हावा, यासाठी किरणांना आत येण्यासाठी जागा मिळावी, याकरिता गरुड मंडपाची उंची सात इंचांनी वाढवण्यात येणार आहे. मंडपाची जमीन खोदून फरशी घालण्याबरोबरच गरुड मंडपाची उंची 7 इंच वाढविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news