'वक्फ'वर लोकसभेत चर्चा; अमित शहांनी दिला कोल्हापूर, बीडमधील महादेव मंदिरांचा संदर्भ

ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाजात अनेक वर्षांपासून न्यायालयीन वाद
Waqf Amendment Bill, Vadang Mahadev Temple Kolhapur
'वक्फ' वर लोकसभेत चर्चा; अमित शहांनी दिला कोल्हापुरातील वडणगेच्या महादेव मंदिराचा संदर्भfile photo
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या भाषणात कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथील महादेव मंदिराचा आणि बीड जिल्ह्यातील कंकलेश्वर मंदिराचा संदर्भ दिला. शहा म्हणाले, वडणगे येथील महादेव मंदिराच्या जागेवर वक्फने दावा केला होता. बीडच्या कंकलेश्वरच्या 12 एकर जागेवरही वक्फने दावा सांगितला होता.

जागेच्या मालकी हक्कावरून न्यायालयीन वाद

वडणगे : येथील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या गट नंबर 89 मधील जागेच्या मालकी हक्कावरून अनेक वर्षांपासून वडणगे ग्रामपंचायत व मुस्लिम समाज यांच्यात न्यायालयीन वाद सुरू आहे. एकूण17 गुंठे जागेत मुस्लिम समाजाची मशीद व काही दुकानगाळे आहेत. करवीर भूमिअभिलेख, जिल्हा भूमिअभिलेख, उपसंचालक भूमिअभिलेख पुणे येथे झालेल्या सुनावणीत या जागेच्या मालकी हक्कावर मुस्लिम समाजाच्या बाजूने निकाल दिला आहे. 29 एप्रिल 2024 रोजी उपसंचालक भूमिअभिलेख पुणे यांनी या जागेच्या मालकीपत्रात फेरफार करण्याचा आदेश दिल्यानंतर, ऑगस्ट 2024 मध्ये महसूल मंत्रालयात झालेल्या सुनावणीत भूमिअभिलेखच्या या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, वडणगे येथील गट नंबर 89 मधील या जागेसंदर्भात लोकसभेत चर्चा झाल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news