Sword Attack | आंबेवाडी सरपंचाच्या पती, दिरावर तलवार हल्ला

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून मारहाण; रजपूतवाडी, पोहाळेतील नशेखोरांचे कृत्य
sword attack Case
Sword Attack | आंबेवाडी सरपंचाच्या पती, दिरावर तलवार हल्लाFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : आंबेवाडी (ता. करवीर) येथे रजपूतवाडी व पोहाळेतील पाच ते सहा नशेखोरांनी केलेल्या तलवार हल्ल्यात सरपंचाचे पती व दीर गंभीर जखमी झाले. मारुती गणपती पाटील (वय 54), तुकाराम गणपती पाटील (वय 50, दोघेही रा. आंबेवाडी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. नातेवाईकांनी जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले.

रजपूतवाडी व पोहाळे परिसरातील काही नशेखोर तरुण आंबेवाडीतील पाणंद रस्त्यावर खुलेआम दारू, गांजाचे सेवन करून गोंधळ घालतात. त्यामुळे या नशेखोर, गुंडप्रवृत्तीच्या तरुणांविरोधात आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार दिल्याचा राग मनात धरून बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हे नशेखोर तरुण आंबेवाडीतील गणेश जनरल स्टोअर्सच्या दारात आले. त्यांनी सरपंच सुमन पाटील यांचे पती माजी सरपंच मारुती पाटील व दीर तुकाराम पाटील यांना जाब विचारत दहशत माजवली. दरम्यान, मारुती व तुकाराम यांना पाच ते सहा तरुणांनी मारहाण करत तलवारीने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. नातेवाईक, ग्रामस्थांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रात्री उशिरा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news