

कासारवाडी : शनिवारी (दि.१७ जानेवारी) सकाळी नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेची मराठी शाळा लहान मुलांनी गजबजली होती. विद्यार्थ्यांचे शाळेच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे कवायत सुरू होती. अचानक शाळेच्या मैदानात गवा शिरला आणि शिक्षक विद्यार्थी धावपळ सुरू झाली.
विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून शिक्षकांनी व गावातील नागरिकांनी गव्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. पण गवा अधिकच बिथरला गव्याने शाळेच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या हिरवे यांच्या घरावर चढला. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही.
गवा घराच्या कौलात अडकला व त्याने शेजारीच असलेल्या एका खाजगी शाळेच्या अंगणात उडी घेतली. नागरिकांच्या दंग्याने गवा बिथरलाआणि इकडे तिकडे पळत सुटला. यामध्ये विद्यार्थी व शिक्षक किरकोळ जखमी झाले. अखेर गवा पाडळीच्या दिशेने धावत गेल्याचे नागरिकांनी सांगितले.