

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसर्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणे देवीच्या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली. यामुळे शनिवारीही भाविकांना पूर्ण क्षमतेने किरणोत्सव न पाहता घरी परतावे लागले.
अंबाबाई मंदिराचा किरणोत्सव शुक्रवारपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीवर कमरेपर्यंत पोहोचली. दुसर्या दिवशी शनिवारी संपूर्ण मूर्तीवर किरणे पोहोचून पूर्ण क्षमतेने किरणोत्सवाची शक्यता होती. मात्र हवेतील आर्द्रता आणि ढगाळ वातावरणामुळे शनिवारी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीवर चरणस्पर्श करून गुडघ्यापर्यंत पोहोचली. 4 वाजून 57 मिनिटांनी गरुड मंडपात आलेल्या किरणांची तीव—ता 5 हजार 200 लक्स होती. 5 वाजून 1 मिनिटांनी चबुतर्यावर किरणांची तीव—ता 6 हजार 300 लक्स झाली. 5 वाजून 13 मिनिटांनी ढग बाजूला झाल्याने किरणांची तीव—ता वाढून 7 हजार 200 लक्स झाली. 5 वाजून 23 मिनिटांनी किरणे गणपती मंदिरापर्यंत पोहोचली. त्यावेळी तीव—ता कमी होऊन 2450 लक्स झाली. साडेपाच वाजता किरणे पितळी उंबर्यापर्यंत पोहोचली तेव्हा तीव—ता केवळ 35 लक्स झाली. चांदीचा उंबरा, गाभारा पायरी, देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श होईपर्यंत 5 वाजून 34 मिनिट ते 5 वाजून 43 मिनिटांपर्यंत किरणांची क्षमता 21, 10 व 4 लक्स इतकी कमी झाली. 5 वाजून 47 मिनिटाला किरणे गुडघ्यापर्यंत पोहोचली.