Ambabai Temple Development Plan | अंबाबाई मंदिर विकास आराखडा, भूसंपादनाचा निर्णय लवकरच

उच्चाधिकार समितीकडे बैठकीसाठी प्रयत्नशील : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर :  बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड. यावेळी उपस्थित प्रभारी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, अधीक्षक अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, संजीवनी कट्टी आदी.
कोल्हापूर : बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड. यावेळी उपस्थित प्रभारी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, अधीक्षक अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, संजीवनी कट्टी आदी.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी आवश्यक भूसंपादनाचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. याबाबतच्या अंतिम निर्णयासाठी उच्चाधिकार समितीकडे या महिन्यात बैठक होईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. डॉ. राठोड म्हणाले, या आराखड्यामध्ये भूसंपादन करण्याला प्रथम प्राधान्य असून, संबंधित विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे. मंदिराच्या शिखराचे रंगकाम करताना त्याचा सर्वोत्तम दर्जा राखला जावा. तसेच, मंदिरात सुरू असलेली वॉटरप्रूफिंगच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कामे येत्या पावसाळ्यापूर्वी करून घ्यावीत. त्याचबरोबर विद्युत विभागाने इलेक्ट्रिकची सर्व कामे काळजीपूर्वक करावीत.

या ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे बाधित झालेल्यांना शासन निकषांनुसार भूसंपादनाबाबत योग्य तो मोबदला दिला जाईल, असे सांगत जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरात सुरू असलेल्या गरूड मंडप, नगारखाना मणकर्णिका कुंड, विद्युत विभाग, मंदिरातील इतर देवतांच्या मूर्ती संवर्धन तसेच इतर कामांचा विस्तृत आढावा घेतला.

बैठकीला पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे तर करवीर विभागाच्या प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता संजीवनी कट्टी, प्रियांका भोईटे, चंद्रकांत इंगवले, एन. एम. बनसुडे आदींसह इतर अधिकारी-पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.