Ambabai Temple | तीन दिवसांत अंबाबाई चरणी साडेचार लाख भाविक

सुवर्ण कळसाच्या दर्शनाचे कुतूहल; अधिकमासाची सांगता
कोल्हापूर : अधिकमास सांगता आणि सलग सुट्टीच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी.
कोल्हापूर : अधिकमास सांगता आणि सलग सुट्टीच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी. (छाया पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : अधिकमासाच्या शेवटच्या पर्वात गेल्या तीन दिवसांत ४ लाख ४७ हजार ६७४ भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. अधिक महिन्याच्या पवित्र पर्वणीमुळे कोल्हापूर शहर आणि मंदिर परिसर भक्तांच्या अलोट गर्दीने गजबजला. मंदिराच्या मुख्य शिखरावर बसवण्यात आलेल्या सुवर्ण कळसाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा उत्साह दिसून येत होता.

अधिक मासाची सांगता, शिखरावर बसविण्यात आलेला सोन्याचा कळस, सलग सुट्टी या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक होती. शुक्रवार, १२ जून रोजी १ लाख २३ हजार ४२०, शनिवार, १३ जून तब्बल १ लाख ७१ हजार ९२६ भाविक आणि रविवार, १४ जून रोजी १ लाख ५२ हजार ३२८ भक्तांनी अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले.

सुवर्णकळसाचेही दर्शन

मंदिर परिसरात दाखल होताच भाविक मंदिराच्या उंच शिखरावर चढवलेल्या सोन्याच्या कळसाकडे डोळे भरून पाहत श्रद्धेने हात जोडत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news