कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील जाहिरात एजन्सींची शिखर संघटना असलेल्या ‘अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज अँड मीडिया असोसिएशन’ (आसमा) च्या अध्यक्षपदी अमरदीप पाटील (अॅडफाईन) यांची 2025-27 या द्वैवार्षिक कालावधीसाठी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय थोरवत, सचिवपदी शिरीष खांडेकर आणि खजिनदारपदी राजाराम शिंदे यांची निवड झाली.
संचालकपदी अभय मिराशी, संजय रणदिवे, विवेक मंद्रुपकर, अविनाश पेंढुरकर, अमरसिंह भोसले, अतुल उपळेकर, शैलेश गर्दे, प्रशांत बुचडे, अनिरुद्ध गुमास्ते, किरण वडगावकर व प्रशांत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी जाहिरात व्यवसायातील अडचणी सोडवून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. बदलत्या काळानुसार सर्व एजन्सींनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जाहिरात व्यवसायातील बदल आणि आव्हाने यावर चर्चा झाली.
यावेळी ‘फेम’च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सुनील बासरानी आणि खजिनदारपदी निवड झालेले कौस्तुभ नाबर यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला दै. ‘केसरी’चे संपादक दीपक टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी येथील सदस्य उपस्थित होते. अनंत खासबारदार, चारुदत्त जोशी यांनी चर्चेत सहभाग घेतला. मनीष राजगोळकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सचिव शिरीष खांडेकर यांनी आभार मानले.

