Almatti's height increase issue | महापुराची पातळी आणखी 15 ते 16 फुटांनी वाढण्याची भीती!

कृष्णा, वारणा, पंचगंगेसह सर्व नद्या भरणार गाळाने; नद्यांचे प्रवाहही होणार अतिशय संथ
Almatti's height increase issue
Almatti's height increase issue | महापुराची पातळी आणखी 15 ते 16 फुटांनी वाढण्याची भीती!Pudhari File Photo
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कृष्णा, वारणा, पंचगंगेसह अन्य सर्व उपनद्या गाळाने खचाखच भरून जाण्याची भीती रूरकी समितीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसे झाल्यास महापुराची पातळी आणखी 15 ते 16 फुटांनी वाढून महापूर प्रदीर्घकाळ कोल्हापूर आणि सांगलीसह नदीकाठच्या गावांमध्ये मुक्काम ठोकून राहील. परिणामी, या गावांचे अस्तित्वच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

रूरकी समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, अलमट्टी धरण 519 मीटरने भरल्यास त्याच्या बॅकवॉटरच्या प्रभावामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नद्यांच्या पाणी पातळीत साडेआठ ते साडेदहा फुटांनी वाढ होते. जर धरणाची उंची 524 मीटर केली तर या धरणाचे बॅकवॉटर थेट 263 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगलीपर्यंत येते. परिणामी कृष्णा नदीच्या उपनद्यांमध्ये महापुराचे पाणी कित्येक दिवस साचून राहील. त्याचप्रमाणे अलमट्टीची उंची वाढविल्यास कृष्णा नदी प्रवाहाचा उतार कमी होऊन गाळ नदीपात्रात गाळ साचून राहण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. त्याचा परिणाम म्हणून कृष्णा नदीसह वारणा, पंचगंगा आणि या भागातील अन्य नद्यांमध्येही गाळ साचून राहील. या सगळ्याचा परिणाम म्हणून अलमट्टीच्या बॅकवॉटरचा प्रभाव आणखी वाढून महापुराचा धोका कित्येक पटींनी वाढू शकतो.

निष्कर्ष काय सांगतात?

रूरकी समितीने अधोरेखित केलेले निष्कर्ष कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसाठी धोक्याची घंटा आहेत. आधीच कृष्णा नदीचा प्रवाह संथ आहे. त्यातच या नदीला सांगलीपासून अलमट्टीपर्यंत उतारही कमी आहे. अशा वेळी अलमट्टीची उंची 524 मीटरपर्यंत वाढल्यास त्याच्या बॅकवॉटरच्या प्रभावामुळे कृष्णेचा प्रवाह आणखी संथ होणार नाही, तर पावसाळाभर जवळजवळ थांबल्यासारखा होईल. शिवाय पाणीपातळी 16 फुटांनी वाढेल. परिणामी, कृष्णेला मिळणार्‍या येरळा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या सगळ्या नद्यांचे प्रवाह नुसते मंदावणार नाहीत, तर थांबल्यासारखे वाटतील. त्यामुळे महिनोन्महिने महापूर जसा काही या भागात ठिय्याच मारून बसेल. अलमट्टीमुळे या भागातील महापूर महिनाभर ओसरत नाही, असा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यातच पुन्हा अलमट्टीची उंची वाढली, तर महापूर संपूर्ण पावसाळाभर या भागात ठाण मांडून बसण्याची भीती आहे.

कोल्हापूरच्या दुर्दशेची भविष्यातील एक झलक..!

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर : 18 ते 19 फूट

बसंत-बहार-जिल्हाधिकारी कार्यालय : 21 ते 22 फूट

कोल्हापूर कमान ते टोल नाका : 22 ते 23 फूट

महाराणा प्रताप हायस्कूल ते दुधाळी ग्राऊंड : 22 ते 23 फूट

मुक्त सैनिक वसाहत ते कदमवाडी गणेश पार्क : 23 ते 24 फूट

पंचगंगा तालीम ते व्हिनस कॉर्नर : 24 ते 25

मेडिकल कॉलेज बावडा ते जयंती नाला परिसर : 25 ते 26 फूट

रिलायन्स मॉल, कुंभार गल्ली : 27 ते 28 फूट

सुतारवाडा ते जुना शिये नाका: 29 ते 31 फूट

सांगलीच्या दुर्दशेची भविष्यातील एक झलक..!

कॉलेज कॉर्नर व परिसर : 18 ते 19 फूट

गोकुळनगर ते बसस्थानक : 23 ते 24 फूट

गुजराती हायस्कूल-ईदगाह मैदान : 28 ते 29 फूट

टिळक चौक, शामरावनगर : 30 ते 31 फूट

रामनगर, व्यंकटेशनगर : 31 ते 32 फूट

हरिपूर रोड, पाटणे प्लॉट, भारतनगर : 32 ते 33 फूट

मारुती चौक आणि गावभाग परिसर : 32 ते 33 फूट

सिद्धार्थनगर, राजीव गांधीनगर: 33 ते 34 फूट

दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी : 40 ते 41 फूट

कर्नाळ रोड, सूर्यवंशी प्लॉट : 41 ते 43 फूट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news