Gokul dudh | अधिकारी 30, कर्मचारी पदांसाठी 20 लाख भरून नोकरभरती

Gokul dudh |
Gokul dudh | अधिकारी 30, कर्मचारी पदांसाठी 20 लाख भरून नोकरभरती
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये अधिकारी पदासाठी 30 लाख आणि कर्मचारी पदासाठी 20 लाख रुपये युथ बँकेच्या कोल्हापुरमधील शाखेत भरून घेतल्यानंतरच संबंधितांना ऑर्डर दिल्याचा आरोप दूध संस्था सभासदांनी केला. तसेच 2016 ते 2021 या पाच वर्षांत झालेल्या 1138 नोकर भरतीची माहिती देण्याची मागणीही संस्था सभासदांनी केली. मागणीचे निवेदन प्रशासक मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे यांना दिले.

गोकुळमध्ये 2016 ते 2021 या पाच वर्षांत 1138 अधिकारी, कर्मचारी यांची भरती झाली आहे. अधिकारी पदासाठी 30 लाख आणि कर्मचारी पदांसाठी 20 लाख रुपये भरल्यानंतरच ऑर्डर दिली जात होती, हे खरं आहे काय? असा प्रश्न करत सविस्तर माहिती देण्याची मागणी निवेदनात केली आहे. प्रशासकांसोबत चर्चा करून माहिती देऊ असे मालगावे यांनी सांगितले. यावेळी बाबासो सांगले, पुरषोत्तम साळोखे, सत्यम पाटील, शशीकांत काकडे, शिवाजी कुडाळकर आदींसह संस्था सभासद उपस्थित होते.

नेत्यांच्या, अधिकार्‍यांच्या घामातून नाही, तर उन्हातान्हात राबणार्‍या दूध उत्पादकांच्या कष्टातून ‘गोकुळ’ उभारले आहे. प्रशासकांकडून माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, दहा-बारा दिवस होऊनही माहिती मिळणार नसेल तर गोकुळला दूध घालायचे का नाही याचा विचार करावा लागेल, असा इशारा सभासदांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news