Maharashtra politics | महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चेस अजित पवारांचा विराम

बारामतीतून उमेदवारीबाबत अद्यापही संभ्रम कायम
Ajit Pawar
वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय, तो दाखवायची वेळ... : अजित पवारांचा इशारा file photo
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आगामी विधानसभेच्या निवडणुका या महायुतीतूनच लढेल. जागावाटप सुरू असून, लवकरच महायुतीचे आम्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाबाबत माहिती देऊ, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. यामुळे अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या वावड्यांना पूर्णविराम मिळाला आहे; मात्र पवार हे बारामतीतूनच लढतील का, याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत सूचक मौन राखल्याने त्यांच्या बारामतीतून उमेदवारीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीमध्ये अद्याप जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रित काम करत आहोत आणि आगामी विधानसभा निवडणुक महायुतीच जिंकेल, असे पवार म्हणाले.

बारामतीमधून लढण्याबाबत मौन

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार पटेल यांनी अजित पवार यांची बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली असली तरी खुद्द पवार यांनी याबाबत मौन बाळगले आहे. बारामतीमधील लोकांचा आग्रह आणि माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमधून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली असली तरी आपण लोकभावनेचा आदर करू, अशा शब्दांत अजित पवार यांनी बारामतीबाबत सस्पेन्स कायम ठेवला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news