

कोल्हापूर : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या रांगड्या शैलीतील संगीत आणि गायकीने वेगळा ठसा उमटवणारे गायक-संगीतकार अजय-अतुल एक खास संगीतमय मेजवानी घेऊन कोल्हापुरात येत आहेत. कोल्हापूरकरांना न भूतो न भविष्यती अशी सांगितिक मेजवानी देणार्या या शोमध्ये आणखी एक आकर्षण असून प्रसिद्ध अभिनेत्री ‘चंद्रमुखी’फेम अमृता खानविलकर या शोचे सूत्रसंचालन करणार असून, ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर ती प्रथमच कोल्हापुरात येत आहे.
महासैनिक दरबार मैदानावर 2 फेब—ुवारी रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत शहरात प्रथमच होणार्या त्यांच्या लाईव्ह शोबद्दल शहरात उत्कंठा वाढली असून तिकीट विक्रीला तुफान प्रतिसाद मिळत आहे. दुर्गा मां एंटरटेन्मेंटच्या वतीने आयोजित या शोचे माध्यम प्रायोजक दैनिक ‘पुढारी’ आणि तर रेडिओ पार्टनर टोमॅटो एफएम आहेत. मुख्य प्रायोजक पीएनजी असून पॉवर्ड बाय चितळे डेअरी असलेल्या या कार्यक्रमाची तयारी सध्या जोरात सुरू आहे.
हा शो म्हणजे कोल्हापूरकरासाठी भव्य सांगितिक पर्वणी ठरणार असून महा सैनिक दरबारच्या भव्य मैदानावर तब्बल 17 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने होणारी ही लाईव्ह कॉन्सर्ट कोल्हापूरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ठरणार आहे. प्रशस्त पार्किंग, बाऊन्सरसह दोन हजार कर्मचार्यांचा समावेश असलेले व्यवस्थापन, आकर्षक ध्वनी-प्रकाश योजना यातून भव्य-दिव्य कार्यक्रमाचा अनुभव कोल्हापूरकरांना मिळणार आहे. अजय-अतुल हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत विश्वातील एक अतुलनीय ब—ँड आहेत. या लाईव्ह शोमध्ये त्यांच्या केवळ गाण्यांचे स्वरच नाही, तर त्यांचे संगीतातील प्रयोग, भाव भावनांची गुंफण आणि चाहत्यांशी त्यांचा असलेला अद्वितीय बॉण्ड पहायला मिळणार आहे.
या शोसाठी कोल्हापूर व परिसरातील लोकांनी तिकीट खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. बुकिंगसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करुन आपली सीट निश्चित करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना ऑफलाईन तिकिटे हवी आहेत, त्यांच्यासाठी शनिवार (दि. 25) पर्यंत ऑफलाईन तिकिटे उपलब्ध आहेत. दै. ‘पुढारी’ कार्यालय, पुढारी भवन, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर, तसेच टोमॅटो एफएम कार्यालय, पाचवा मजला वसंत प्लाझा, बागल चौकाजवळ राजाराम रोड कोल्हापूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहेत. दुर्गा मां एंटरटेन्मेंट ऑफिस, गुरु अपार्टमेंट, सिटी सर्व्हे नं 293 ई वॉर्ड, न्यू शाहूपुरी येथेही ऑफलाइन तिकीट विक्री सुरु राहणार आहे.
या कार्यक्रमात अँकरिंग करण्याची संधी मिळाल्याने अमृता खूपच एक्साईट आहे. या बद्दल दैनिक ‘पुढारी’शी बोलताना अमृता म्हणाली, ‘अजय-अतुल या दोन महान संगीतकारांसोबत स्टेज शेअर करणे नेहमीच आनंददायक असते. आपण भाग्यवान आहोत आणि अभिमानाने सांगू शकतो की अजय-अतुल हे आपले आहेत. त्यांनी जागतिक स्तरावर पोहोचून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे, याचा मला खूप अभिमान आहे. कोल्हापूर ही रसिकांची नगरी आहे. या नगरीत येणे माझ्यासाठी नेहमीच खास असते. यंदा अजय-अतुल यांच्यासोबत स्टेज शेअर करणे आणि नवीन वर्षात पुन्हा आई अंबाबाईचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळत आहे. यासाठी आयोजक दुर्गा मां एंटरटेन्मेंट, दत्ता बाबर व दीपक सगरे यांचे मी आभार मानते. मी सर्व कोल्हापूरकरांना आग्रह करते की तुम्ही नक्की या आणि या अद्भुत संगीत प्रवासाचा भाग व्हा. तर मग, तुम्ही येताय ना? असं अमृताने म्हटले आहे.