आज-यात भरवस्तीत चाकूने भोसकून तरूणाचा खून

Kolhapur crime news | या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे
आज-यात भरवस्तीत चाकूने भोसकून तरूणाचा खून
Published on
Updated on

आजरा : शहरात भरवस्तीत चाकूने भोसकून तरूणाचा खून करण्यात आला. कैफ साजिद खनिज (वय : २३, रा : वाडा गल्ली) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सनी अब्दुल गफार तकिलदार (वय २६ रा. दर्गा गल्ली, आजरा) व आतिफ इस्माईल हिंग्लजकर (वय १९ रा. पटेल कॉलनी आजरा) हे दोघेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित अरकम महम्मद लमतुरे, अबु सुफियान महम्मद लमतुरे, शकील हसनअली खेडेकर (सर्व रा. नाईक गल्ली, आजरा ) या तिघांना ताब्यात घेतले आहे.

आज-यात भरवस्तीत चाकूने भोसकून तरूणाचा खून
Pune Crime : अपघाताचा बनाव; मात्र एका कॉलने खुनाला वाचा फुटली

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी बुधवारी (दि.1) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाईक गल्ली येथील मरकज मस्जिद समोर हे सर्वजण एकत्र आले. सुरुवातीला वेगवेगळ्या विषयावरून त्यांच्यात थट्टा मस्करी सुरू झाली. कालांतराने त्यांच्यात वाद सुरू झाला व वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. याचवेळी अरकम लमतुरे याने आपल्याजवळील चाकू काढून त्याने मृत कैफसह शमी तकिलदार व आतिफ हिंग्लजकर यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. तर अबुसुफियान व शकील यांनी लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केले.

आज-यात भरवस्तीत चाकूने भोसकून तरूणाचा खून
Sindhudurg murder | कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाचा गोळी झाडून खून; शहरात खळबळ

यामध्ये कैफ खतीफ हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने गडहिंग्लज येथे उपचारासाठी हलवत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. तर समी तकिलदार व अतिफ हिंग्लजकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेचे वृत्त समजतात नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news