अंबाबाई किरणोत्सवात हवा प्रदूषणाचा अडथळा

शहराची हवा डेंजर झोनमध्ये; हवा गुणवत्ता निर्देशांक 324 वर
Ambabai Kironotsav
अंबाबाई किरणोत्सव
Published on
Updated on
आशिष शिंदे

कोल्हापूर : शहरातील खराब रस्ते, दिवसेंदिवस वाढत जाणारे वाहनांचे प्रमाण यामुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक धोका पातळी ओलांडून पुढे गेला आहे. प्रमुख मार्गांसह गल्लोगल्ली उडणारे धुळीचे लोट मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करतच आहेत. आता हवा प्रदूषणाने पश्चिमेकडून अंबाबाई मंदिरात येणार्‍या सूर्यकिरणांचा मार्ग देखील क्षीण केला आहे. शहरातील एका केंद्रावर सोमवारी पार्टिक्युलेट मॅटरचे प्रमाण 276 होते तर मंगळवारी हे प्रमाण 322 होते. ही धोकापातळी मानली जाते. तज्ज्ञांच्या मते याच अतिसूक्ष्म व श्वसनीय धूलिकणांमुळे (पार्टिक्युलेट मॅटर) सूर्यकिरणांच्या तीव—तेत अडथळा निर्माण झाला आणि अंबाबाई मंदिरात होणारा किरणोत्सव सोहळा पूर्ण होऊ शकला नाही. धक्कादायक बाब म्हणजे मंगळवारी कोल्हापूरचा हवा गुणवत्ता निर्देशांक 324 वर गेला होता.

हवेत मोठ्या प्रमाणात श्वसनीय व अतिसूक्ष्म धूलिकण वाढल्यास सूर्यकिरणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यास अडथळा येऊ शकतो. अंबाबाई मंदिरात किरणोत्सव होण्यासाठी गाभार्‍यात सूर्यकिरणांची तीव—ता ही किमान 25 लक्स इतकी लागते. लक्स हे किरणांची तीव—ता मोजण्याचे एकक आहे. सोमवारी चांदीच्या उंबर्‍याजवळ आलेल्या किरणांची तीव—ता केवळ एक लक्स होती. 9 तारखेला 2.5 लक्स होती. कोरोना काळात सूर्यकिरणांची तीव—ता 160 लक्स होती. रविवारी, सोमवारी होते 1 ऑक्टा ढगाळ वातावरण सूर्यकिरणे मंदिरात येण्यासाठी किरण मार्गातील अनेक अडथळेही कारणीभूत आहेत. याशिवाय ढगाळ वातावरणही तितकेच कारणीभूत आहे. मात्र हवामान विभागाच्या अहवालानुसार रविवारी व सोमवारी 1 ऑक्टा इतके ढग होते तर शनिवारी 0 ऑक्टा ढग होते. ऑक्टा हे ढगाळ वातावरण मोजण्याचे एक प्रमाण आहे. सोमवारी हवा निर्देशांक 257 तर रविवारी 174 होता. तीनही दिवशी हवा प्रदूषीत करण्यास पार्टिक्युलेट मॅटर 2.5 व पार्टिक्युलेट मॅटर 10 हेच जबादार होते.

धुके, ढगांची झालर आणि हवेत वाढलेले पार्टिक्युलेट मॅटर यामुळे सूर्याच्या किरणांची तीव—ता कमी झाली. अपेक्षित तीव—ता मिळली नसल्याने किरणोत्सव होऊ शकला नाही.
प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, विवेकानंद कॉलेज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news