कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरण सांगणार महापुराची मिनिटागणीक स्थिती

कोल्हापूरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा अभिनव प्रयोग; डिझाईनला मिळाले पेटंट
A flood warning device
एका कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणामुळे महापुराची स्थिती कळणार आहे.Pudhari File Photo
Published on
Updated on
आशिष शिंदे

कोल्हापूर : पावसाच्या बदललेल्या पॅटर्नबरोबरच हवामानातील बदलाने अनिश्चितता तयार झाली आहे. या अनिश्चिततेतून कोल्हापूर, सांगली या भागाला महापुराच्या संकटाचा सामना करावा लागतो. प्रत्येक मिनिटाला नदीची पातळी किती वाढेल, याची अचूक पूर्वसूचना देणारे फ्लड मॉनिटरिंग व अर्ली वॉर्निंग सिस्टीम हे उपकरण आकार घेत आहे. राधानगरी आणि शिवाजी पूल येथे हे उपकरण बसवता येणे शक्य असून, सॅटेलाईट इमेज, ग्राऊंड सेन्सर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने महापुराची अचूक माहिती उपलब्ध करून देणार आहे.

महापुराचे गंभीर संकट दरवर्षी कोल्हापूरकरांसमोर उभे राहत आहे. 2005, 2019 व 2020 साली आलेल्या महापुरांमुळे कोल्हापूरकरांचे मोठे नुकसान झाले होते. महापुराच्या या संकट काळात कोल्हापूरकरांना मदत व्हावी, यासाठी स्वरूप यादव या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने फ्लड मॉनिटरिंग आणि अर्ली वॉर्निंग सिस्टीम हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाच्या डिझाईनला भारत सरकारकडून पेटंट मिळाले आहे. या उपकरणाच्या प्रोटोटाईपचे सध्या काम सुरू असून, येत्या एक-दोन महिन्यात ते काम पूर्ण होईल.

...असे काम करणार फ्लड वॉर्निंग सिस्टीम फ्लड मॉनिटरिंग आणि अर्ली वॉर्निंग

सिस्टीम तीन प्रकाचा डेटा गोळा करणार आहे. यामध्ये गेल्या 20 वर्षांतील पावसाचा पॅटर्न लोड केला जाणार आहे. यामध्ये गेल्या 20 वर्षांत किती पाऊस झाला, पावसाची तीव—ता काय होती, कोणत्या भागात किती पाऊस झाल्यानंतर पंचगंगेची पातळी वाढते हे फिड करण्यात येईल. त्यानंतर यातील एक उपकरण राधानगरी येथे, तर दुसरे उपकरण शिवाजी पूल येथे बसवता येऊ शकते. राधानगरीतील उपकरण तेथे होणार्‍या पावसाचे प्रमाण, धरण क्षेत्रातून होणारा पाण्याचा विसर्ग ही सर्व माहिती गोळा करेल. त्यानंतर पंचगंगेच्या उपकरणासोबत हा डेटा लिंक केल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशिन लर्निंग टर्मचा वापर करून हा सर्व डेटा प्रोसेस होईल आणि येणार्‍या प्रत्येक मिनिटाला पंचगंगेची पाणी पातळी किती वाढेल, याचा अंदाज मिळणे शक्य होणार आहे.

मोबाईलवर मिळणार वॉर्निंग

फ्लड मॉनिटरिंग व अर्ली वॉर्निंग सिस्टीममुळे कधी, कोठे आणि कसा पूर येईल हे समजण्यास मदत होणार आहे. या डिव्हाईसची अ‍ॅक्युरसी 95 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशिन लर्निंग टर्मचा वापर करून स्कॅन केलेला डेटा पूरबाधित 500 मीटर क्षेत्रातील सर्व मोबाईल यूझर्सना एसएमएसद्वारे पाठवतादेखील येऊ शकतो.

आपल्याला पूर कसा आणि किती येईल याचा अंदाज नसतो. मात्र, फ्लड मॉनिटरिंग सिस्टीममुळे पुराची तंतोतंत माहिती मिळण्यास मदत होईल. ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित इलेक्ट्रॉनिक बेस्ड सिस्टीम आहे.
- प्रा. डॉ. मनीषा भानुसे, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज
येत्या दोन ते तीन महिन्यांत उपकरण तयार होईल. उपकरण तयार झाल्यानंतर त्याद्वारे कोल्हापूरकरांना पुराची माहिती मिळावी यासाठी ते प्रशासनाला देणार आहोत.
- स्वरूप यादव, इंजिनिअरिंग विद्यार्थी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news