शिरढोण येथे लक्ष्मी सेवा संस्थेत संचालक, कर्मचाऱ्यांनीच उचलले शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज

बोगस कर्ज टाकून फसवणूक; विभागीय सह निबंधकांकडे तक्रार
Agriculture Loan Fraud
शिरढोण येथे लक्ष्मी सेवा संस्थेत शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज टाकून फसवणूकfile photo

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथील लक्ष्मी विकास सेवा सोसायटीच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी सभासदांची फसवणूक करून आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी बोगस कर्ज नावावर टाकली आहेत, अशी तक्रार संस्थेच्या सहा सभासदांनी शिरोळ सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि विभागीय सह निबंधक यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे गावात खळबळ

संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी संगनमताने पीक कर्ज खावटी कर्ज व आकस्मित कर्ज, अशी बेकायदेशीर कर्जे आमच्या नावावर टाकली आहेत. तसेच सदर कर्ज आमच्या खात्यावर येणेबाकी रक्कम दाखवली आहे. हे आम्हाला मान्य नाही, असे तक्रारीत सभासदांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींमुळे गावात खळबळ उडाली आहे. सचिवाच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून संस्थेच्या एका संचालकासह दोघांना अटक केलेले प्रकरण ताजे असताना दुसरी तक्रार दाखल झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत. एकूण सहा शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये सुकमार रामू पुजारी, शांताबाई जयंत चौगुले, कमल रघुनाथ बिरोजे, विश्वजीत श्रीरंग घोरपडे, सचिन विजयकुमार बोरा, शीतल शंकर बालीघाटे या सभासदांचा समावेश आहे.

Agriculture Loan Fraud
उद्योजक शिरीष सप्रे यांचे निधन

'संस्थेला अडचणीत आणण्यासाठी तक्रार'

तक्रारदार यांच्या बँक मंजुरी व मागणी अर्जानुसार कर्जाची रक्कम के. डी. सी. सी. बँकेच्या खात्यात जमा केलेली आहे. संस्थेची जबाबदारी कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणे एवढीच आहे. बँक खात्यात जमा झालेली रक्कम कर्जदार आपल्या गरजेनुसार त्याचा वापर करतो, त्याचा संस्थेशी काही संबंध नाही. तक्रारदारांनी आजपर्यंत कधीही संस्थेत याबाबत तक्रार दिलेली नाही. सदर तक्रार ही निव्वळ संस्थेला अडचणीत आणणे व राजकारण करण्यासाठी केलेली आहे, असा दावा संस्थेचे चेअरमन सोहेल बाणदार यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news