Sambhajiraje | विकासवाडीतील क्रिकेट मैदानाचा करार लवकरच : संभाजीराजे

जिल्हा क्रिकेट असोसिएशनला ३० एकर जागा ९० वर्षांसाठी मिळणार
Sambhajiraje |
Sambhajiraje | विकासवाडीतील क्रिकेट मैदानाचा करार लवकरच : संभाजीराजे
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला लवकरच हक्काचे मैदान मिळणार आहे. विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडून ३० एकर जागा ९० वर्षांच्या कराराने मिळणार आहे. याबाबतचा करार जुलै महिन्यातच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती माजी खासदार व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी दिली.

जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रविवारी धैर्यप्रसाद हॉलमध्ये संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते म्हणाले, जिल्हा क्रिकेट असोसिएशनला स्वत:चे हक्काचे मैदान मिळावे, यासाठी गेली दोन वर्षे राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. प्रारंभी १५ एकर जागेची मागणी करण्यात आली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत राज्यातील तब्बल ५ सचिवांची बैठक बोलवून क्रिकेट मैदानासाठी दुप्पट म्हणजेच ३० एकर जागा विकासवाडी येथे उपलब्ध करून दिली. याबाबतचा करार लवकरच करण्यात येणार आहे.

कोल्हापूरचे मैदान राज्यात क्रमांक १ चे असेल

मैदानासाठी अत्यावश्यक असणारी जागा राज्य शासनाने दिली; पण मैदानासाठी एक रुपयाही देणार नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र, जिल्हा क्रिकेट असोसिएशनने निधी संकलनाचा आराखडा तयार केला आहे. यामुळे कोल्हापूरचे क्रिकेट मैदान महाराष्ट्रातील क्रमांक एकचे मैदान होईल. याचा फायदा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि सीमा भागातील लोकांना होईल. आगामी चार वर्षांत मुंबई-पुण्यानंतर कोल्हापुरात क्रिकेटचे मैदान भरेल, असा विश्वास व्यक्त करून पावसाळ्यातही सराव करता येईल, असे मैदान उभारले जाईल, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news