कोल्हापूर : महाद्वार रोडवर बिनखांबी गणेश मंदिरामागे असलेल्या अॅड. नरवणकर लिगल चेम्बर्सचे शनिवारी दिमाखात उद्घाटन झाले. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि भारताचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अॅड. रफीकदादा यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी अॅड. पी. बी. नरवणकर, अॅड. युवराज नरवणकर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाला झुबेरदादा, माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे, माजी उपमहापौर भूपाल शेटे, अॅड. शिल्पा महामुनी, अॅड. रश्मी साजणीकर, योगेश नरवणकर, अॅड. नेहा नरवणकर, रेखा नरवणकर, रुचिका नरवणकर, सिद्धार्थ नरवणकर आदी उपस्थित होते. अॅड. नरवणकर गेले 60 वर्षे वकिली व्यवसायात आहेत. अॅड. पी. बी. नरवणकर यांच्याबरोबरच आता अॅड. युवराज नरवणकर सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, कोल्हापूर सर्किट बेंच येथे प्रॅक्टिस करत आहेत. अॅड. युवराज नरवणकर लॉ कॉलेजमधील सुवर्णपदक विजेते विद्यार्थी आहेत. सध्या ते केंद्र सरकारच्या वरिष्ठ विधिज्ञ पॅनेलवरही आहेत. नरवणकर लिगल चेम्बर्समध्ये पक्षकारांना दिवाणी, फौजदारी खटल्यांबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.