Gokul Dairy | ‘गोकुळ’ संदर्भातील चुकीचे संदेश हटवा, अन्यथा कारवाई

प्रशासक संजयकुमार सुद्रीक यांचा इशारा; दूध, दुग्धजन्य पदार्थांचा हलाल प्रमाणपत्राशी संबंध नसल्याचे केले स्पष्ट
Gokul dairy
Gokul Dairy | ‘गोकुळ’ संदर्भातील चुकीचे संदेश हटवा, अन्यथा कारवाईPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळबाबत समाजमाध्यमांवर काही घटकांकडून चुकीच्या अथवा अपुर्‍या माहितीच्या आधारे संभ—म निर्माण करणारे संदेश प्रसारित केले जात आहेत. हा प्रकार गोकुळच्या प्रतिमेला बाधा पोहोचवणारा असून, संबंधितांनी वस्तुस्थितीची खातरजमा करूनच माहिती प्रसारित करावी. यापूर्वी प्रसारित केलेले चुकीचे व दिशाभूल करणारे संदेश तातडीने हटवावेत, अन्यथा गोकुळच्या ब्रँडची बदनामी झाल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांनी प्रशासक मंडळाच्या बैठकीत दिला.

गोकुळच्या प्रशासक मंडळाची शनिवारी गोकुळ शिरगाव येथील मुख्य प्रकल्पस्थळी बैठक झाली. बैठकीमध्ये हलाल प्रमाणपत्राबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सुद्रिक यांनी गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ भारतीय मानकांनुसार उच्च दर्जाचे व गुणवत्तापूर्ण असून, त्यांच्या गुणवत्ता व दर्जाचा हलाल प्रमाणपत्राशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ग्राहकांनी सोशल मीडियावरील अफवा व दिशाभूल करणार्‍या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.

ते म्हणाले, 1963 पासून गोकुळ ही सहकारी संस्था दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांच्या विश्वासावर उभी आहे. संघाकडून ग्राहकांना सातत्याने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले जातात. गोकुळने FSSAI, ISO 22000, EIC आणि HACCP यांसारख्या गुणवत्ता व अन्नसुरक्षा मानकांचे काटेकोर पालन केले असून, उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. हलाल प्रमाणपत्र हे केवळ आखाती देशांमध्ये निर्यातीसाठी तेथील आवश्यकतेनुसार घेण्यात आले होते. या प्रमाणपत्राचा आणि गोकुळच्या उत्पादनांच्या गुणवत्ता व दर्जाचा कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला प्रशासक मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सुनील धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news