

कोल्हापूर : रत्नागिरी येथून कोल्हापूर महापालिका प्राथमिक शाळेत कार्यरत झालेल्या शिक्षकाचा तीन महिन्याच्या थकित पगारासह फरकाच्या रकमेसाठी 25 हजाराची लाच घेणार्या मनपा प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासनाधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. दगडू चंद्राप्पा कुंभार (52, रा. वाशी नाका, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
तक्रारदार शिक्षकाने संशयित कुंभारला मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयात लाचेची रक्कम देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कार्यालयात रक्कम न घेता चप्पल लाईन येथे रक्कम घेतली. पथकाने गराडा घालून त्याला ताब्यात घेतले. नाहरकत पत्रासाठी यापूर्वीही त्याने 10 हजार रु. उकळल्याचे सांगण्यात आले.