सीपीआरचा श्वास कोंडला

अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : इमारतींच्या सौंदर्याला बाधा
Administration's neglect of CPR encroachments
कोल्हापूर : सीपीआरच्या नवीन अपघात विभागासमोरील अतिक्रमण करून उभा केलेल्या टपर्‍या. Pudhari File Photo
एकनाथ नाईक

कोल्हापूर : सीपीआर आवारातील अतिक्रमण काढण्याचा प्रश्न प्रलंबित असतानाच आता चार ते पाच अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे 16 अतिक्रमणे आणि शेकडो दुचाकींमुळे परिसरात रुग्णवाहिका पुढे जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. अतिक्रमण काढण्यास प्रशासन पुढे आले तर पक्ष, संघटना, काही राजकीय नेते दबाव टाकतात. त्यामुळे प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे सीपीआर प्रशासनच बेजार झाले आहे.

Administration's neglect of CPR encroachments
सीपीआर रुग्णालयाच्या निधीवर पांढरपेशांचा दरोडा?

सीपीआरमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयासमोर आणि फिजिओथेरपी सेंटरला लागून तीन हातगाड्या आणि दुकाने थाटली आहेत. ज्यूस, चहा, बिस्कीट, जेवणाच्या या टपर्‍या आहेत. कोरोना सेंटरसमोर एक टपरी आहे; तर कर्मचार्‍यांच्या घरासमोर एक चहाची टपरी आहे. अपघात विभागाच्या जवळ झेरॉक्स सेंटर आहे. हनुमानाच्या मंदिराजवळ 1994 च्या काळात चतुर्थ श्रेणी कामगार संघटनेने झुणका भाकर केंद्र उघडले होते. कालांतराने केंद्राची जागा चहा व नाष्टा सेंटरने घेतली. प्रसूती विभाग परिसरात दोन टपर्‍या आणि ब्लड बँकेच्या इमारतीमध्ये खासगी कॅन्टीन आहे. क्षयरोग विभाग वॉर्डला लागून एक तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाच्या मागे दोन टपर्‍या आहेत. औषध भांडारगृहाला लागून एक टपरी आहे. या टपर्‍यांमुळे सीपीआरच्या हेरिटेज इमारतींसह अन्य इमारतींचे सौंदर्य लुप्त झाले आहे.

Administration's neglect of CPR encroachments
सीपीआर ड्रेसिंग मटेरियल खरेदीत घोळ

थेट वॉर्डात पदार्थांची विक्री

थेट वॉर्डात जाऊन टपरीधारक खाद्य पदार्थांची विक्री करतात. रुग्णालयात असे पदार्थ विक्री करणे गुन्हा आहे. विषबाधा होण्याचा धोका असल्यामुळे अन्न औषध प्रशासनाला याबाबत कळविले आहे. मात्र, प्रशासन डोळे झाकून गप्प आहे.

Administration's neglect of CPR encroachments
‘सीपीआर’ने मागविले पिण्याचे पाणी विकत

विजेसह पाणी चोरी

टपरीधारकांनी सीपीआरमधून चोरून वीज आणि पाण्याचे नळ घेतले आहेत. दररोज लाखो लिटर पाण्याची येथून चोरी होते. विजेवर चालणारी उपकरणे या टपरीवर आहेत. वर्षाला कोट्यवधी रुपयांचा विजेसह पाणी बिलाचा भार सीपीआरवर पडतो. दरवर्षी महावितरण, महापालिका थकीत बिलापोटी सीपीआर प्रशासनाला नोटीस बजावते.

Administration's neglect of CPR encroachments
कोल्हापूर : ‘सीपीआर’मध्ये एमआरआयच्या आशा पल्लवित

रुग्णालयापेक्षा टपरीवरचा कचरा अधिक

सीपीआरमध्ये कचर्‍याची गंभीर समस्या आहे. दररोज येथे कचर्‍याचे मोठे ढीग साचतात. रुग्णालययातील जैव वैद्यकीय, घनकचर्‍यापेक्षा टपर्‍यांवरील कचरा येथे अधिक असल्याचे स्वच्छता विभागाच्या निदर्शनास आले आहे.

Administration's neglect of CPR encroachments
‘सीपीआर’मधील कचर्‍याचे मनपाला वावडे?

नेत्याकडून दबाव

टपरीधारकांना राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आहे. अतिक्रमणाचा विषय पुढे आला की, टपरीधारक नेत्यांकडे जातात. माझा कार्यकर्ता आहे. त्याच्या टपरीला धक्का लागता कामा नये, अन्यथा बघून घेऊ, असा दम अधिकार्‍यांना दिला जातो. ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या पाईपच्या खालीच टपर्‍या असल्याने मोठी दुर्घटना होण्याचा धोका वाढला आहे. काहींनी टपर्‍या भाड्याने दिल्या आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news