KYC rules | ई-केवायसी न करणार्‍यांवर प्रशासनाची नजर

‘मिशन सुधार’अंतर्गत रेशन बंद होण्याची शक्यता ः 3 लाख 56 हजार जणांचा समावेश
KYC rules  |
KYC rules | ई-केवायसी न करणार्‍यांवर प्रशासनाची नजर
Published on
Updated on

कोल्हापूर : वारंवार मुदत देऊनही जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 56 हजार नागरिकांची रेशन कार्डसाठीची ई-केवायसी झालेली नाही. अशा ई-केवायसी न करणार्‍या नागरिकांवर प्रशासनाची नजर आहे. मिशन सुधार मोहिमेअंतर्गत या नागरिकांचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या रेशन कार्डवर नोंद असलेल्या नागरिकांची ई-केवायसी केली जात आहे. त्याला वारंवार मुदत वाढवून दिली जात आहे, तरीही जिल्ह्यात तब्बल 16.48 टक्के नागरिकांची ई-केवायसी झालेली नाही. वारंवार मुदत वाढवून, प्रत्येक वेळी ई-केवायसी करण्याबाबत सूचना देऊनही ती होत नाही. यामुळे पुरवठा विभागाच्या द़ृष्टीने ही सर्व संशयित नावे मानली जात आहेत.

ई-केवायसी न करणार्‍या नागरिकांच्या वाट्याचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात मिशन सुधार मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत ई-केवायसी न झालेल्यांचे धान्य बंद करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

* का होत नाही ई-केवायसी?

* विविध कारणांनी बाहेरगावी स्थलांतर

* वयोवृद्ध झाल्याने हाताचे ठसे जुळेनात

* कष्टाच्या कामामुळे हातांचे ठसे जुळेनात

* वयोगटानुसार आधार कार्ड अपडेट नाही

* मृत्यू होऊनही रेशन कार्डवर नावे कायम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news