कोराणेला आश्रय देणार्‍यांवर मोकाअंतर्गत कारवाई शक्य

खबर्‍यामार्फत माहितीसाठी पोलिसांच्या हालचाली
Action possible under MOCA against those who give shelter to Korane
कोराणेला आश्रय देणार्‍यांवर मोकाअंतर्गत कारवाई शक्यFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईनंतरही 6 वर्षे फरार राहिलेला मटकाबुकी सम्राट सुभाष कोराणे (वय 42, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) याच्या कृत्याची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची गंभीर दखल घेतली आहे. फरार काळात कोराणेला आर्थिक रसद पुरविणार्‍या किंबहुना त्याला आश्रय देणार्‍यांचा तातडीने छडा लावून प्रसंगी संबंधितांवर मोकाअंतर्गत कारवाईचे तपासाधिकार्‍यांना निर्देश देण्यात आल्याचे शनिवारी रात्री सांगण्यात आले.

कोराणे यांच्या सहा वर्षांतील हालचालीची गोपनीय खबर्‍यामार्फत माहिती काढण्याच्या हालचालीही पोलिसांनी गतिमान केल्या आहेत, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या आक्रमकपणामुळे कोराणे समर्थकांसह मटका उलाढालीशी संबंधित व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, कोराणेला ताब्यात घेतल्यापासून काही मंडळींनी शहरातून काढता पाय घेतल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयानेही संशयितांना तपासाधिकार्‍यांसमोर हजर होण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचेही संबंधितांनी उल्लंघन केले. त्याच्या एकूण वर्तनाची गृहमंत्रालयापर्यंत गंभीर दखल घेण्यात आली. शनिवारी (दि. 8) पोलिस मुख्यालयात क्राईम आढावा बैठकीत शहर पोलिस उपअधीक्षक तथा तपासाधिकारी अजित टिके हे दिवसभर व्यस्त असल्याने कोराणे याच्या चौकशीसाठी त्यांना वेळ मिळाला नाही. मात्र, आजपासून (रविवार) चौकशीची सूत्रे गतिमान होण्याची चिन्हे आहेत, असेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news