तेरवाड मार्गावर अपघातांची मालिका सुरूच; डुलकीमुळे कारची आयशरला धडक, जीवितहानी टळली

या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
तेरवाड मार्गावर अपघातांची मालिका सुरूच; डुलकीमुळे कारची आयशरला धडक, जीवितहानी टळली
Published on
Updated on

कुरुंदवाड : तेरवाड–सलगर–सदलगा मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी पहाटे डुलकी लागल्याने भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या आयशर वाहनाला जोराची धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली.

गोवा येथील भाविक अक्कलकोट येथे देवदर्शन करून परत गोव्याकडे जात असताना पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मारुती सुझुकी इगिन्स (क्र. GA 04 E 8589) ही चारचाकी गाडी चालकाला डुलकी आल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर वाहनावर आदळली. अपघातात कारचे इंजिन पूर्णपणे चक्काचूर झाले.

दरम्यान, या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिन्यापूर्वी घालवाड येथील एका युवकाचा चारचाकी अपघातात मृत्यू झाला होता. पंधरा दिवसांपूर्वी राघवेंद्र टॉकीजजवळ ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी तेरवाड वजनकाटा परिसरात कुरुंदवाड येथील आकाश गोसावी यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी मध्यरात्री कारने दोन सख्ख्या भावंडांना उडवून गंभीर जखमी केले होते.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन धोकादायक ठिकाणी दिशादर्शक फलक, वेगमर्यादा सूचना, रिफ्लेक्टर तसेच इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news