Shivaji Patil | गोकुळमधील पराभव मान्य करून पुढे जायला हवे : आ. शिवाजी पाटील

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर साधला निशाणा
आ. शिवाजी पाटील
Shivaji Patil | गोकुळमधील पराभव मान्य करून पुढे जायला हवे : आ. शिवाजी पाटील
Published on: 
Updated on: 

आजरा : गोकुळमधील सध्याच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण खराब होत आहे. गोकुळमध्ये १३ विरुद्ध १२ असा आमचा पराभव झाला असताना तो मान्य करून पुढे जायला हवे होते. मात्र, एका नेत्याने चार सदस्यांची मागणी करण्याचा हट्ट धरला आणि त्याला सरकारनेही दुजोरा दिला. ही बाब मला मान्य नाही. अशा प्रकारच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण बिघडत असल्याची टीका आ. शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केली.

कोळिंद्रे येथे महालक्ष्मी यात्रेतील देणगीदारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. माजी राज्यमंत्री भरमू पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी भाजपचे नेते अशोक चराटी, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार, पं.स. सदस्य समीर पारदे, तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी, संभाजी सरदेसाई, सरपंच वंदना सावंत, उपसरपंच दीपाली पाटील प्रमुख उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीत महायुतीतील एका नेत्याने विरोधकांना मॅनेज करून घात केला. गडहिंग्लज तालुक्याच्या दुष्काळी समावेशासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रांताधिकारी, कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक सरकारविरोधी घोषणा देत होते. मंत्रीच कार्यकर्त्यांना पाठीशी घालत असतील, तर ते चुकीचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.