

कोल्हापूर : कोल्हापूरच्या नाट्यप्रेमींसाठी ‘पुढारी नाट्योत्सव’ खास सांस्कृतिक मेजवानी घेऊन आला आहे. आनंद भवन, सायबर कॉलेज कॅम्पस येथे मंगळवारी (दि. 7) झालेल्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाचा प्रयोग प्रचंड गर्दीत झाला. नाट्योत्सवाच्या दुसर्या दिवशी ‘आमने-सामने’ नाटकाचा प्रयोग होणार असून याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
‘मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ’ हे या नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत, तर ड्रीम व्हिजन हॉस्पिटॅलिटी हे सहप्रायोजक आहेत. या दोन दिवसीय नाट्योत्सवात मराठी रंगभूमीवरील दोन गाजलेली नाटके सादर होत आहेत. बुधवारी (दि. 8), दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांचे कौटुंबिक नाटक ‘आमने-सामने’ सादर होणार आहे. कुटुंबातील दोन पिढ्यांच्या विचारांतील अंतर आणि लग्नसंस्थेवर खुसखुशीत भाष्य करणार्या या नाटकात ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. पिढीनुसार बदलणार्या नात्यांचे आयाम अत्यंत रंजक पद्धतीने यात मांडले आहेत. हे नाटक प्रेक्षकांना हसवता-हसवता विचार करायला लावते.
रसिक, नाट्यप्रेमींनी आपल्या कुटुंबीयांसोबत व मित्रपरिवारासोबत या लोकप्रिय कलाकृतीचा आनंद घेण्यासाठी नाट्यगृहात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘आमने-सामने’ प्रयोगाची तिकिटे दिवसभर गायन समाज देवल क्लब येथे उपलब्ध आहेत.
नाटक : आमने-सामने
ठिकाण : आनंद भवन, सायबर कॉलेज कॅम्पस, कोल्हापूर
वेळ : सायं. 7.00 वाजता
नाटकाची तिकिटे आनंदभवन, सायबर कॉलेज येथे सकाळी 10 पासून नाट्यगृहावर उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क ः 9561626663