Aajra Accident | आजऱ्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्‍यू : उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर मुमेवाडी घाटात भीषण अपघात

दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर धडक, मुमेवाडी घाटात अपघात, मृतांमध्ये आईवडील व दोन लहान मुलांचा समावेश
अपघातात ठार झालेले कुटूंब व अपघाग्रस्त वाहने
अपघातात ठार झालेले कुटूंब व अपघाग्रस्त वाहने
Published on
Updated on

आजरा : मुमेवाडी (ता आजरा) येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील चार जण ठार झाले. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून, ते व्हन्याळी ता. आजरा येथील रहिवाशी आहेत. दीपक दत्तात्रय चांदे (वय 45), शोभा दीपक चांदे (वय 33), जय दीपक चांदे (वय 9), पूर्वा दीपक चांदे (वय 6) अशी मृतांची नावे आहे.

याबाबात अधिक माहिती आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली असून टेम्पो रस्त्‍याच्या बाजूला उलटला आहे. याखाली सापडल्याने दुचाकीवरील चौघेही ठार झाले.

या अपघातामुळे हसतं-खेळतं कुटुंब क्षणात काळाच्या पडद्याआड गेले आहे. अपघाताची माहिती व्हन्याळी गावात समजमाच गाव परिसरत शोककळा पसरली आहे. याची माहिती कळताच पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news