कोल्हापूर : अंबपवाडी रस्त्यावर स्कूल बस नाल्यामध्ये घसरली

बसमध्ये विद्यार्थी नसल्याने दुर्घटना टळली
A school bus tipped into a stream
ओढ्यामध्ये कललेली स्कूलबसPudhari Photo
Published on
Updated on

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा

हातकणंगले तालुक्यातील अंबप-अंबपवाडी रस्त्याला पेठ वडगांव येथील जिनियस इंग्लिश मीडियमची स्कूलची बस शुक्रवारी (दि.1) घसरली. सुदैवाने शाळेचे विद्यार्थी सोडून परताना ही घटना घडल्याने यात विद्यार्थी नव्हते. यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. शुक्रवारी दिवसभर पावसाची संतधार सुरूच आहे. सायंकाळी जिनेसियस इंग्लिश मीडियम, पेठवडगाव येथील स्कूलबस लहान मुलांना शाळेतून घेऊन घरी सोडून परतताना अंबपवाडी रस्त्याला डोंगरे वस्तीजवळ स्कूल बस समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना बाजूला घेतल्यानंतर नाल्यात घसरली. सुदैवाने यात मुले नव्हती. यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

A school bus tipped into a stream
सांगली : स्कूलबस ओढ्यात कोसळली, ११ विद्यार्थी जखमी

या रस्त्याला मागील काही दिवसापासून अनेक वेळा नाल्यात वाहने घसरण्याच्या घटनेत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच शाळेची मुले घेऊन जाणारी मारुती व्हॅन, कोळशाचा ट्रक, दोन दिवसापूर्वी वाळूचा डंपर, अशी वाहने घसरली आहेत. पावसामुळे रस्त्याच्या बाजू पट्ट्या कमजोर झाल्या आहेत. येथून अवजड वाहनांची वाहतूक सतत होत असते .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news