A. S. Traders Agent Arrested | चार वर्षांपासून पसार असलेल्‍या ए. एस. ट्रेडर्सच्या एजंटला अटक

A. S. Traders Agent Arrested |
A. S. Traders Agent Arrested | चार वर्षांपासून पसार असलेल्‍या ए. एस. ट्रेडर्सच्या एजंटला अटक
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सचा मुख्य एजंट अभिजित साहेबराव शेळके (वय ४२, रा. स्टर्लिंग टॉवर, गवत मंडई, शाहूपुरी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून ३ वर्षे ९ महिने तो पसार होता. देवडी (ता. मोहोळ, सोलापूर) येथे सापळा रचून ही कारवाई केली.

ऑक्टोबर २०२२ मध्ये गुन्हा दाखल होताच शेळके पसार झाला होता. देवडी (ता. मोहोळ, सोलापूर) येथे मूळ गावी तो शेतीची कामे करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली. यानुसार त्यांनी पोलिस अंमलदार युवराज पाटील, राजू कोरे, शुभम संकपाळ यांना देवडी येथे पाठवले. बुधवारी रात्री अभिजितला शेतात सापळा रचून अटक केली.

वडील बाहेर, मुलगा आत...

अभिजितचे वडील साहेबराव याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. त्याला गुन्हा दाखल होताच अटक केली होती. दहा दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला आहे. तो बाहेर येताच अभिजित पोलिसांच्या तावडीत सापडला.

रुबाब उतरला...

ए. एस. ट्रेडर्समध्ये अभिजित व त्याच्या वडिलांनी सुरुवातीच्या काळात मोठी गुंतवणूक केली होती. यानंतर तो मुख्य एजंट बनला होता. यातून त्याने मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. यातून त्याने आलिशान मोटारी घेतल्या होत्या. त्याचे राहणीमान उंची झाले होते. आता मात्र त्याच्यावर ओळख लपवून शेतमजूर म्हणून शेतात राहण्याची वेळ आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news