IT Sector | आयटी क्षेत्रात 4,500 कोटींच्या निर्यातीचा आराखडा तयार

70 हजार रोजगारनिर्मितीची क्षमता; स्वतंत्र सर्व्हिस एक्स्पोर्ट डेस्कची मागणी
IT Sector |
IT Sector | आयटी क्षेत्रात 4,500 कोटींच्या निर्यातीचा आराखडा तयार
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरची ओळख ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून मर्यादित न ठेवता, ती ‘ग्लोबल आयटी डेस्टिनेशन’ म्हणून करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापुरात आयटी पार्क येणार ही चर्चा अनेक दिवसांपासून सुरू असली, तरी कोल्हापुरात आयटीमध्ये काम करणार्‍या कंपन्यांच्या कोल्हापूर आयटी असोसिएशनने जिल्हा प्रशासनाला 4,500 कोटींच्या आयटी निर्यातीची ब्ल्यू प्रिंट दिली आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित ‘महानिर्यात’ परिषदेत आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर (आयटॅक) ने याबाबत प्रेझेंटेशन दिले. कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राचा 4,500 कोटींच्या निर्यातीचा आराखडा सादर केला.

आयटॅकचे अध्यक्ष प्रताप पाटील आणि सचिव राहुल मेंच यांनी प्रशासनासमोर मांडलेल्या सादरीकरणात कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राची ताकद अधोरेखित केली आहे. 2 कोटींवरील आयटी निर्यात आज 300 कोटींवर पोहोचली आहे. योग्य पाठबळ मिळाल्यास ही निर्यात 4,500 कोटींपर्यंत नेणे सहज शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयटी निर्यातीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्वतंत्र ‘सर्व्हिस एक्स्पोर्ट डेस्क’ची निर्मिती, सवलतीच्या दरात आयटी पार्कसाठी जागा आणि अद्ययावत इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 2023 च्या आयटी धोरणात कोल्हापूरसारख्या शहरांसाठी अधिक पोषक बदल करण्याची विनंती आयटॅकच्या वतीने केली आहे.

लक्ष्य गाठण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजना

स्थानिक युनिटस्ना बळ : केवळ परदेशी किंवा मोठ्या एमएनसी कंपन्यांची वाट न पाहता, सध्याच्या 372 आयटी कंपन्यांना सक्षम करण्यावर भर.

रोजगारनिर्मिती : सध्या 9,000 असलेल्या रोजगाराचा आकडा 70,000 पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.

ब्रेन ड्रेनला लगाम : पुणे, बंगळूरकडे होणारे तरुणांचे स्थलांतर थांबवण्यासाठी कोल्हापुरातच जागतिक दर्जाच्या संधींची निर्मिती.

स्त्री-पुरुष समानता : आयटी क्षेत्रामुळे रोजगारातील जेंडर इक्वालिटी वाढवण्यावर भर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news