कोल्‍हापूर : गव्याचा फाइव्ह स्‍टार मुक्‍काम; तळंदगे जवळ पहाटे दर्शन, नागरिकांत दहशत | पुढारी

कोल्‍हापूर : गव्याचा फाइव्ह स्‍टार मुक्‍काम; तळंदगे जवळ पहाटे दर्शन, नागरिकांत दहशत

हुपरी ; अमजद नदाफ

कोल्हापूर शहरात संचार करुन आता गवा तळंदगे गावाजवळ असलेल्या पंचतारांकित वसाहतीत असणाऱ्या महापारेषणच्या उपकेंद्राजवळ आला आहे. आज (रविवार) पहाटे अनेकांना पाझर तलावाजवळ त्याचे दर्शन झाले. शहरातील मुक्कामानंतर गवा आता फाइव्ह स्टार मुक्कामी आल्याने नागरिकांची भंबेरी उडाली आहे.

तळंदगे गावानजीकच फाइव्ह स्टार एमआयडीसी जवळ महापारेषणचे मोठे उपकेंद्र आहे. या उपकेंद्राजवळच एक तळे आहे. त्या ठिकाणी आज पहाटे गव्याचे दर्शन झाले. तेथून तो हवालदार मळ्याकडे गेला असे काही नागरिकांनी सांगितले. गव्याच्या दर्शनामुळे नागरिकांत खळबळ माजली असून, लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पाझर तलावाजवळ पहाटे फिरायला गेलेल्या लोकाना हा गवा दिसला. त्यांनी त्या भागातील लोकांना त्याची कल्पना देऊन अॅलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. तर गवा गावशेती असलेल्या भागातही आढळला आहे. त्यामुळे पंचतारांकित वसाहतीत कामाला जाणाऱ्या कामगारांनी सावधपने जावे असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस पाटील समीर मुल्लणी यांनी याबाबत हुपरी पोलिसांना माहिती दिली आहे. तळंदगे गावाजवळ महापारेशनच्या उपकेंद्राजवळ पाझर तलावाजवळ गव्याचे रविवारी दर्शन झाल्‍याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button