गृह शुद्धीकरणाच्या बहाण्याने टोळीकडून 84.69 लाखांचा गंडा

9 जणांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
84.69 lakhs fraud by the gang on the pretext of home purification
वृद्ध शेतकर्‍याला 84 लाख 69 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : काळी जादू काढून गृह शुद्धीकरणाच्या बहाण्याने गंगावेश येथील वृद्ध शेतकर्‍याला 84 लाख 69 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी संशयित दादा पाटील महाराज, आण्णा ऊर्फ नित्यानंद नारायण नायक, तृप्ती मुळिक, सोनाली पाटील ऊर्फ धनश्री काळभोर, गोळे, कुंडलिक झगडे, ओंकार, भरत, हरिश यांच्यासह 9 जणांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

फेब्रुवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळात कोल्हापुरातील गंगावेश, कणकवली या ठिकाणी पूजा मांडून पैसे उकळण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुभाष हरी कुलकर्णी (वय 77, रा. गंगावेश) यांनी संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. कौटुंबिक समस्या, त्रास दूर करतो, असा बहाणा करून संशयितांनी संगनमताने 49 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व बँक खात्यावरील 54 लाख 84 हजाराची रक्कम; शिवाय चांदीच्या वस्तू अशी एकूण 84 लाख 69 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे. लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या टोळीतील संशयितांची पूर्ण नावे आणि त्यांचा पत्त्याचा सविस्तर तपशील मिळू शकला नसल्याचे सांगण्यात आले.

फिर्यादी सुभाष कुलकर्णी यांच्या पन्हाळा तालुक्यातील काही मालमत्तासंदर्भात न्यायालयात दावे सुरू आहेत. याशिवाय काही अडचणीमुळे कुलकर्णी कुटुंबीय चिंतेत होते. या अडचणीतून सुटका होण्यासाठी संशयित फेब्रुवारी 2023 मध्ये कुलकर्णी यांच्या घरी आले. त्यांनी या समस्या सोडविण्याचे काम दादा पाटील महाराज करतील असे सांगितले. संशयित पाटील महाराज यांच्यासह अन्य पाच संशयित व त्यांचे साथीदार सुभाष कुलकर्णी यांच्या घरी आले. गावातील काही मंडळींनी तुमच्या घरावर काळी जादू व तुमच्या घरांवर भूतबाधा केली असल्याचे सांगितले. फेब्रुवारी महिन्यात पाटील यांच्या घरी पूजा मांडून रोख 60 हजार रुपये उकळण्यात आले. घरातील अनेक वस्तूवर काळी जादू करण्यात आली असल्याचे सांगून सोन्याचे दागिने, चांदीचे अलंकार, जुनी भांडी, सागवानी फर्निचर, घरातील ग्रंथ या सर्व वस्तू टेंपोत भरून नेण्यात आल्याचेही म्हटले आहे.

घरात वेगवेगळ्या पूजा घालण्यासाठी धनश्री काळभोर हिने विविध बँक खात्यावरील वेगवेगळ्या रकमा वर्ग करण्यास भाग पाडून 54 लाख 84 हजार रुपये उकळल्याचे म्हटले आहे. भामट्यांनी फिर्यादी कुलकर्णी यांचे 49 तोळे सोन्याचे दागिने,2 लाख 80 हजाराचे चांदीचे अलंकार व वस्तू, 54 लाखाची रोकड असा एकूण 84 लाख 69 हजाराची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. पसवणूक प्रकरणातील संशयिताना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके विविध भागात रवाना करण्यात आल्याचेही रात्री उशिरा सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news