District Health Department : महाराष्ट्र शासनाची औषधे कर्नाटकात? | पुढारी

District Health Department : महाराष्ट्र शासनाची औषधे कर्नाटकात?

शिरोळ : पुढारी वृत्तसेवा : District Health Department : जिल्हा आरोग्य विभागाने महाराष्ट्र शासनाकडून महापूर व कोरोना काळात तसेच नियमित थंडी, ताप, खोकला व लहान मुलांच्या आजारासाठी रुग्णांना दिली जाणारी औषधे आता कर्नाटक सीमाभागातही मिळू लागली आहेत. काहींनी ही औषधे कर्मचार्‍यांवर दबाव वाढवून परस्पर लंपास करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

ही औषधे कर्नाटकातील रुग्णांना पैसे घेऊन विक्री केली जात आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमालगत असणार्‍या अकिवाट, टाकळीवाडी, राजापूर, राजापूरवाडी, घोसरवाड, नवे दानवाड, दत्तवाड, खिद्रापूर, जुने दानवाड यासह 11 गावांतील नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

District Health Department : 40 टक्के औषधे परस्पर कर्नाटकातील खासगी दवाखान्यांना विकली

उपकेंद्र व प्राथमिक केंद्राला आवश्यक असणार्‍या औषधांपेक्षा जादा औषधांची मागणी करून त्यापैकी 40 टक्के औषधे परस्पर कर्नाटकातील खासगी दवाखान्यांना विकली जातात.

जिल्हा परिषदेकडे औषधाची मागणी करताना कर्नाटकात वापरण्यास लागणारी औषधे महाराष्ट्रातील मागणी यादीत लिहिली जातात. याच औषध गोळ्यांचा वापर कर्नाटकात केला जातो.

महाराष्ट्रातील शासनाची औषध, गोळ्या कर्नाटकात मिळत असलेल्या माहिती संदर्भात आरोग्य विभाग सध्यातरी अनभिज्ञ आहे. या प्रकाराची सत्यता पडताळण्यात येणार आहे. चौकशी करून पुराव्यासहित जिल्हा पातळीवर अहवाल सादर करून कारवाई करण्यात येईल.
– डॉ. पी. एस. पाखरे, तालुका वैद्यकीय अधिकारी

Back to top button