'बिद्री ' हा सभासदांचा कारखाना आहे; झालेली कारवाई मला आवडली नाही : हसन मुश्रीफ

सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कने कारवाई केली हाेती
bidri is a members factory i did not like the action taken hasan mushrif
सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कने कारवाई केली हाेतीFile Photo

बिद्री : पुढारी वृत्तसेवा

कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने २१ जून रोजी अचानक तपासणीची केलेली कारवाई मला आवडलेली नाही. बिद्री कारखाना हा के. पी. पाटील यांच्या मालकीचा नाही. तो ६५ हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे. काही शंका असल्यास कारखान्याची तपासणी करण्यापेक्षा माजी आमदार के. पी. पाटील यांच्या घराची इन्कमटॅक्स किंवा इडीने तपासणी करायला हवी होती. असा निशाना सरकारवरच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 'पुढारी' शी बोलताना साधला.

bidri is a members factory i did not like the action taken hasan mushrif
CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचा उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईचा निषेध करताे...

ना. मुश्रीफ म्हणाले, महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात आंम्ही सर्व होतो. निवडणूकीच्या विजयानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनी महाविकास आघाडीचे खासदार शाहू छत्रपती यांचे स्वागत व सत्कार केला. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रवेश केला असा अर्थ होत नाही. तरीही के. पी. पाटील यांना मी निवडणुकीचा निकाल ताजा असताना अशी कृती करणे मला आवडले नाही तशी तीव्र भावना मी त्यांना बोलून दाखविली होती. पण राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणी कारवाईचा मी निषेध करतो. के. पी. पाटील महाविकास आघाडीकडे जात आहेत. हे गृहीत धरून हे जर कारवाई करीत असाल तर बिद्री कारखाना हा के. पी. पाटील यांच्या मालकीचा नाही. तो सभासदांच्या मालकीचा आहे. कारखान्याची तपासणी करण्यापेक्षा शंका असल्यास माजी आमदार के. पी. पाटील यांच्या घराची इन्कमटॅक्स किंवा इडीने तपासणी करायला हवी होती. असा टोला लगावला.

राजकारणामध्ये असे करून कधी यशस्वी होता येत नाही. राजकारणाच्या मैदानामध्ये चितपट किंवा पाट टेकवूनच लढाई जिंकता येते. अशा कारवाया करून नाही. यामुळे उलट के. पी. पाटील यांनाच अधिक सहानुभूती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news