कोल्हापूर : हुपरीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक ९ हजारांची लाच रंगेहाथ जाळ्यात | पुढारी

कोल्हापूर : हुपरीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक ९ हजारांची लाच रंगेहाथ जाळ्यात

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : हुपरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार यांच्यावर गुन्ह्याचा तपास न करण्यासाठी ९ हजार रुपयाची लाज स्वीकारल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दिलीप योसेफ तिवडे (वय ५५, रा. कदमवाडी कोल्हापूर ) असे त्यााचेचे नाव आहे. अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने सोमवारी (दि. 19) ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे त्यांच्या शेजारी राहणारे यांचेबरोबर पाळीव कुत्रे चावल्याचे कारणावरून भांडण झाले होते. त्याबाबत त्यांचेवर एकमेकांवर हुपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. त्याप्रमाणे तक्रारदार व त्यांचे मुलावर दाखल गुन्हयाचा तपास हुपरी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस  निरीक्षक दिलीप तिवडे हे करीत आहेत. तपासादरम्यान स.पो.नि. तिवडे यांनी तक्रारदार व त्यांचे मुलावर दाखल असले गुन्हयात त्यांना अटक न करणेसाठी व गुन्हयात मदत करतो असे सांगुन त्यांचेकडे १०,०००/- रू. दयावे लागतील अशी मागणी केली

तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये आलोसे स. पो.फौ. तिवडे यांनी तक्रारदार यांना त्यांचे मुलास अटक न करणेसाठी व गुन्हयात मदत करतो असे म्हणुन १०,०००/- रूपयांची मागणी करून तडजोडीअंती ९,००० /- रूपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले

त्यानंतर सापळा कारवाई आयोजीत केली असता पंच साक्षीदारांचे समक्ष तक्रारदार यांचेकडुन आरोपी लोकसेवक दिलीप योसेफ तिवडे, सहायक पोलीस फौजदार, नेमणुक हुपरी पोलीस ठाणे जि. कोल्हापूर यांनी स्वत: साठी मागणी केलेप्रमाणें तडजोडी अंती ९,०००/- रूपये स्विकारलेने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन सदर आलोसे यांचेविरूध्द हुपरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

सदरची कारवाई श्री. अमोल तांबे, पोलीस उपआयुक्त / पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे. श्रीमती डॉ. शितल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्यान ब्युरो, पुणे यांचे मार्गदर्शनानुसार तसेच श्री सरदार नाळे, पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली श्री बापु साळुंके पोलीस निरीक्षक, श्री संजिव बंबरगेकर, श्रेपोसई, पो.हे.कॉ. श्री सुनिल घोसाळकर, पो.ना. सचिन पाटील, मपोकॉ पुनम पाटील, चा पो.हे.कॉ. सुरज अपराध, चा.पो.हे.कॉ. विष्णु गुरव अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.

 

Back to top button