कोल्हापूर : जैनापूर येथे बिबट्या दिसल्याने खळबळ, निमशिरगाव येथे शेळी मेंढीची सहा पिल्ले ठार | पुढारी

कोल्हापूर : जैनापूर येथे बिबट्या दिसल्याने खळबळ, निमशिरगाव येथे शेळी मेंढीची सहा पिल्ले ठार

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : सांगली कोल्हापूर बायपास मार्गावरील शिरोळ तालुक्यातील जैनापूर व निमशिरगाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने जयसिंगपूर परिसरातील गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान निमशिरगाव येथे शेळी व मेंढीचे ६ पिल्ले ठार केल्याची घटना घडली आहे. यावरील हल्ला हा बिबट्याने केल्या असल्याच्या संशयातून वनविभागाने साफळा लावला. रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे पथक जैनापूर येथील खासदार हॉटेल परिसरात पाहणी करीत होते.

याबाबत अधिक माहिती अशी, सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावरून जैनापूर येथे एक बिबट्याने महामार्ग ओलांडताना प्रवाशीनी पाहिले. यानंतर अनेकांनी या सर्व प्रकारची माहिती स्थानिक ग्रामस्थ व वन विभागाला तातडीने दिली. यावरून वन विभागाने माहिती घेतली असता बुघवारी रात्री निमशिरगाव येथे शेळी मेंढीची ६ पिल्लाचा अज्ञात प्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली.

यावरून या पिल्लाच्या हल्ल्यात बघण्यानुसार बिबट्याने हल्ला केला असल्याचा संशय वन विभागाला आहे. दरम्यान वनविभागाने जैनापूर व निमशिरगाव परिसरातील साफळा लावला आहे. त्याचबरोबर अनेक मार्गावर वनविभागातच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तर हा बिबट्या दानोळी डोंगरावरुन निमशिरगाव डोंगरापर्यत आला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत स्वाभिमानीचे विक्रम पाटील यांच्यासह वनविभागाचे अधिकारी यांच्यासह पाहणी करीत होते. या बिबट्याच्या दर्शनाने जयसिंगपूर परिसरातील जैनापूर, तमदलगे, दानोळी, कोथळी, उमळवाड, उदगाव, चिपरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर रात्री शेतकऱ्यांनी शेतात न जाण्याचे अहवान करण्यात आले आहे.

Back to top button