7 Year Old Boy Dies | धरणगुत्तीत खणीत बुडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

7 Year Old Boy Dies |
7 Year Old Boy Dies | धरणगुत्तीत खणीत बुडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

जयसिंगपूर : खेळताना खणीकडे गेलेल्या ईश्वर कोमल कांबळे (वय ७, रा. लक्ष्मी नगर, धरणगुत्ती, जयसिंगपूर) या मुलाचा गोळीबार खणीत पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. याबाबतची वर्दी रमेश शिवलिंग कांबळे यांनी शिरोळ पोलिसांत दिली .

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, ईश्वर हा दुसरीच्या वर्गात शिकत होता. तो सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मित्रांसोबत खेळण्यासाठी गेला होता. यावेळी जयसिंगपूर शहरालगत असलेल्या धरणगुत्ती हद्दीतील गोळीबार खणीतील पाण्यात ईश्वर पडला. सोबत असलेल्या मुलांनी नागरिकांना ईश्वर खणीत पडल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ खणीत उतरून त्याला बाहेर काढले व जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.