कोल्हापूर : भोगावतीच्या सत्तेचे पी.एन.पाटील किंगमेकर, बहुमताकडे वाटचाल

कोल्हापूर : भोगावतीच्या सत्तेचे पी.एन.पाटील किंगमेकर, बहुमताकडे वाटचाल

राशिवडे; प्रवीण ढोणे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीमध्ये सताधारी आमदार पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील, शेकापचे संपतराव पवार-पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची बहुमत मिळविले आहे. पुन्हा एकदा भोगावतीच्या सतेचे किंगमेकर पी.एन.च ठरले आहेत. २५ पैकी २४  जागा जिंकत पुन्हा सतेची सुत्रे ताब्यात ठेवली आहेत.

भोगावतीसाठी ८६.३३टक्के चुरशीने मतदान झाले.सतारुढचे आमदार पी.एन.पाटील,राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील संपतराव पवार यांचे राजर्षी शाहू शेतकरी आघाडी, भाजप, शिवसेना, शेकापची शिवशाहू परिवर्तन आघाडी व संस्थापक कै.दादासाहेब पाटील आघाडीमध्ये चुरस झाली होती.

सत्ताधारी गटातील २४ व विरोधी १ असे २५ उमेदवार आघाडीवर राहिले आहेत.राधानगरी तालुक्यातील कौलव गटातून उमेदवार राजाराम कवडे व धिरज डोंगळे, राशिवडे गटातून मानसिंग पाटील, अविनाश पाटील, कृष्णराव पाटील, प्रा ए डी चौगले, कसबा तारळे गटातून अभिजित पाटील, रवींद्र पाटील, दत्तात्रय हणमा पाटील, तर करवीर तालुक्यातील कुरुकली गटातून शिवाजी कारंडे, डी आय पाटील, केरबा भाऊ पाटील, पांडुरंग पाटील, सडोली खा गटातून रघुनाथ जाधव, अक्षय पवार पाटील, बी ए पाटील, प्रा शिवाजी पाटील, हसूर दुमाला गटातून प्रा सुनील खराडे व सरदार पाटील आघाडीवर आहेत.

तर सत्ताधारी गटाच्या महिला राखीव सिमा मारुती जाधव व रंजना दिनकर पाटील, अनुसूचित जाती दौलू कांबळे, इतर मागासवर्ग हिंदूराव चौगले आणि भटक्या विमुक्त जाती तानाजी काटकर तर  विरोधी कौलवकर आघाडीचे धैर्यशील पाटील हे आघाडीवर आहेत.

तर सत्ताधारी गटाचे उमेदवार विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर पिछाडीवर राहिले आहेत. मात्र अंतीम निकाल मध्यरात्री जाहीर होण्याची शक्यता आहे.

दोन्ही तालुक्यामध्ये सतारुढ पॅनेल आघाडीवर

भोगावतीच्या कार्यक्षेत्रामध्ये राधानगरी, करवीर तालुक्यातील ५८ गावे आहेत. दोन्ही तालुक्यामध्ये सतारुढ पॅनेल आघाडीवर राहीले. तर राधानगरीमध्ये धैर्यशील पाटील यांचे कै.कौलवकर तर करवीरमध्ये शिवशाहू परिवर्तन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहीली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news