Kolhapur News : शित्तूर वारूण येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सारिका ही आपली आई गंगाबाई गावडे हिच्यासोबत घराच्या शेजारी जनावरे चारण्यासाठी घेऊन गेली होती. यावेळी झुडुपाआड दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक सारिका हिच्यावर हल्ला केला. तिच्या आईने व शिवारात असलेल्या एका मुलाने तिला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बिबट्याने तिच्या नरडीचा घोट घेतल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर बिबट्याच्या हल्ल्याच्या तीव्र जखमा दिसून येत होत्या. ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा अक्षरशा हृदय पिळवटून टाकणारा होता. Kolhapur News
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. लोकांच्या एकाही प्रश्नाला वन अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.
हेही वाचा