राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (दि.१९) मतदान होत आहे. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला भोगावती परिसरात काहीसा कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एका आघाडीमध्ये स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील व आण्णापा चौगले यांची उमेदवारी असल्याने कार्यकर्ते मतदान प्रक्रियेमध्ये व्यस्त होते. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता कमी होती.
स्वाभिमानी संघटना आणी आंदोलन म्हणजे भोगावती कारखाना परिसरात वेगळाच विषय असतो.आज भोगावतीसाठी मतदान होत असल्याने स्वाभिमानीचे आंदोलनाला कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. खुद्द स्वाभिमानीचे शिलेदार निवडणूक रिंगणात असल्याने कार्यकर्ते मतदानाच्या धावपळीत होते.
भोगावती साखर कारखान्याची निवडणूक असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातात घेतलेले आंदोलन येथे शिथिल असल्याचे दिसून आले. खुद्द संघटनाच या निवडणुकीत सहभागी असल्याने चक्काजाम कोण करणार ? हा महत्त्वाचा विषय होता. शिवाय आज या परिसरात चक्काजाम केल्यास निवडणुकीच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो, हाही येथे महत्त्वाचा भाग होता.
हेही वाचा